महिलांसाठी खास संधी, 'या' योजनांमध्ये गुंतवणूक करा; करोडपती व्हा
आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महिला अनेक प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
![महिलांसाठी खास संधी, 'या' योजनांमध्ये गुंतवणूक करा; करोडपती व्हा Womens Investment News Information on special schemes for women to invest महिलांसाठी खास संधी, 'या' योजनांमध्ये गुंतवणूक करा; करोडपती व्हा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/02/414abaeb90ad31247bd7ee8eda3f84d71709344723955339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Womens Investment: अलिकडच्या काळात गुंतवणुकीसाठी (Investment) विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवण्यासाठी विविध योजना देखील सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महिला अनेक प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना
येत्या 8 मार्च 2024 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला महिलांसाठी अशा गुंतवणूक पर्यायांची माहिती देत आहोत जे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकतात.सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना हा एक अतिशय लोकप्रिय गुंतवणूक पर्याय आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही 15 वर्षांसाठी वार्षिक 1.50 लाख रुपये गुंतवू शकता. सध्या या योजनेवर सरकार 7.1 टक्के व्याजदराचा लाभ देत आहे.
नॅशनल पेन्शन सिस्टम
नॅशनल पेन्शन सिस्टम ही एक उत्तम गुंतवणूक योजना आहे. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करुन तुमचे भविष्य सुरक्षित करु शकता. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे नियंत्रित केली जाते.
म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा उत्कृष्ट पर्याय
आजच्या काळात म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा उत्कृष्ट पर्याय म्हणून उदयास आला आहे. मोठ्या प्रमाणात लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक कत आहेत. त्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन महिला म्युच्युअल फंडाच्या इक्विटी, डेट किंवा हायब्रीड फंडात गुंतवणूक करू शकतात. तसेच महिला त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी जीवन विमा पॉलिसींमध्येही गुंतवणूक करू शकतात. भारतीय आयुर्विमा महामंडळ महिलांच्या गरजेनुसार वेळोवेळी अनेक योजना सुरू करते.
आरोग्य विमा
वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर, आजकाल आरोग्य विमा खरेदी करणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, आरोग्य विमा खरेदी करून तुम्ही तुमच्या वैद्यकीय बिलांच्या खर्चाची चिंता करण्यापासून मुक्त होऊ शकता.
मुदत ठेव योजना
मुदत ठेव योजना देखील एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. तुम्ही वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर तपासून एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता.
सुकन्या समृद्धी योजना
मुलींच्या भविष्यासाठी, सरकार सुकन्या समृद्धी योजना (सुकन्या समृद्धी योजना 2024) चालवते. या योजनेत 8.2 टक्के व्याज मिळते. या योजनेत वार्षिक किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतील. ही योजना 21 वर्षात परिपक्व होते. या योजनेत, पालकांना मुलीच्या नावे सलग 15 वर्षे पैसे जमा करावे लागतात. 10 वर्षांपर्यंतच्या मुलींचे पालक या योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेद्वारे चांगली रक्कम जोडू शकतात. ही योजना अशा पालकांसाठी खूप चांगली आहे ज्यांना सुरक्षित आणि हमी परतावा असलेल्या योजनेवर विश्वास आहे. त्यामुळं पैशांची गुंतवणूक करुन परतावा मिळवण्याचा हा चांगला मार्ग आहे.
महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)