गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाल्यानंतर मला धक्काच बसला, कारण आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की मंत्री भरत गोगावले यांनाच रायगडचे पालकमंत्रीपद द्यावं, असे मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं.
Uday Samant : पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाल्यानंतर मला धक्काच बसला, कारण आमचं सगळ्यांचं म्हणणं होतं की मंत्री भरत गोगावले यांनाच रायगडचे पालकमंत्रीपद द्यावं. 7 पैकी 6 आमदारांना देखील गोगावलेंना पालकमंत्रीपद द्यावं असं वाटतं होतं, असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं. काही गोष्टी नजर चुकीने झाल्या असतील. आमचं सगळ्यांचं म्हणणं होत की गोगावले यांना पालकमंत्री पद मिळायला पाहिजे होतं पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असेही सामंत म्हणाले.
नाशिकचं पालकमंत्रीपद देखील दादा भुसे यांना मिळेल असं वाटत होतं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाही. ते फ्लाईटमध्ये होते पण लवकरच मी बोलेण असेही सामंत म्हणाले. अनेकांच म्हणणं होतं की गोगावले यांना पालकमंत्री द्यावं असे सामंत म्हणाले. पालकमंत्रीपदाची यादी आल्यावर उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. आम्हाला वाटत होत की गोगावले यांना हे पद द्यावं असे सामंत म्हणाले. सोबतच, नाशिकचं पालकमंत्रीपद देखील दादा भुसे यांना मिळेल असं वाटत असताना त्यांना देखील ते मिळालं नाही असे सामंत म्हणाले. दादा भुसे हे आमचे मार्गदर्शक आहेत. अशातच त्यांचा निर्णय व्हायला हवा होता असे सामंत म्हणाले.
दावोसचा दौरा होतोय यावर विरोधकांकडून टीका होतेय, बदनामी होतेय. आम्ही विक्रमी एमओयू केले आहेत. यावेळी देखील विक्रमी एमओयू करु, लाखो रोजगार महाराष्ट्रात आणू असेही सामंत म्हणाले. आम्ही केलेलं काम योग्य होतं हे जनतेला माहिती आहे. कोण खरं आणि कोण खोटं आहे हे दिसून येतं आहे असे सामंत म्हणाले.
पालकमंत्रिपदाची संपूर्ण यादी
1. गडचिरोली - अजित पवार
2. ठाणे - एकनाथ शिंदे
3. मुंबई शहर - एकनाथ शिंदे
4. पुणे - अजित पवार
5. बीड - अजित पवार
6. नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे
7. अमरावती चंद्रशेखर बावनकुळे
8. अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील
9. वाशिम - हसन मुश्रीफ
10. सांगली - चंद्रकांत पाटील
11. नाशिक - गिरीश महाजन
12. पालघर - गणेश नाईक
13. जळगाव -गुलाबराव पाटील
14. यवतमाळ - संजय राठोड
15. मुंबई उपनगर - आशिष शेलार तर सहपालकमंत्री - मंगलप्रभात लोढा
16. रत्नागिरी - उदय सामंत
17. धुळे - जयकुमार रावल
18. जालना - पंकजा मुंडे
19. नांदेड - अतुल सावे
20. चंद्रपूर - अशोक उईके
21.सातारा - शंभूराज देसाई
22. रायगड - आदिती तटकरे
23.लातूर - शिवेंद्रराजे भोसले
24. नंदूरबार - माणिकराव कोकाटे
25.सोलापूर - जयकुमार गोरे
26. हिंगोली - नरहरी झिरवाळ
27. भंडारा - संजय सावकारे
28. छत्रपती संभाजीनगर - संजय शिरसाट
29. धाराशिव - प्रताप सरनाईक
30. बुलढाणा - मकरंद जाधव
31. सिंधुदुर्ग - नितेश राणे
32. अकोला - आकाश फुंडकर
33. गोंदिया -बाबासाहेब पाटील
34. कोल्हापूर - प्रकाश आबिटकर तर सह पालकमंत्री - माधुरी मिसाळ
35. वर्धा - पंकज भोयर
36.परभणी - मेघना बोर्डिकर
महत्वाच्या बातम्या: