Gold Silver Rate : धनत्रयोदशीच्या दिवशी ग्राहकांना सोनं-चांदी स्वस्त मिळणार की महाग? वाचा आजचे दर
Gold Silver Rate : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,650 रूपयांवर आला आहे.
Gold Silver Rate : दिवाळी (Diwali 2022) सणाला सुरुवात झाली आहे. आणि आज धनत्रयोदशीचा (Dhanteras 2022) दिवस आहे. या दिवश धनाची पूजा केली जाते. त्याचबरोबर आजच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे ग्राहकांची सोने-चांदी (Gold-Silver Rate) खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,650 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 57,690 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
शहर | सोने | 1 किलो चांदीचा दर |
मुंबई | 46,429 | 57,690 |
पुणे | 46,429 | 57,690 |
नाशिक | 46,429 | 57,690 |
नागपूर | 46,429 | 57,690 |
दिल्ली | 46,347 | 57,590 |
कोलकाता | 46,365 | 57,610 |
जागतिक बाजारातील सोन्या-चांदीचे दर : (International Gold-Silver Rate) :
जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याची स्पॉट किंमत 0.35 टक्क्यांनी घसरून $1,689.01 प्रति औंस झाली. शुक्रवारीही सोन्याचा भाव 0.41 टक्क्यांनी घसरला होता. सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीची स्पॉट किंमत आज 1.86 टक्क्यांनी घसरून 19.76 डॉलर प्रति औंस झाली आहे. तथापि, शेवटच्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच सोमवारी चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाली.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :
Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला फक्त एक रुपयात खरेदी करा सोनं, होम डिलिव्हरीही उपलब्ध