सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, किसान सभेचा इशारा
सरकारी सोयाबीन (soybean) खरेदीची मुदत संपली आहे. त्यामुळं शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत. कारण अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी होती.

Kisan Sabha on soybean purchasing : सरकारी सोयाबीन (soybean) खरेदीची मुदत संपली आहे. त्यामुळं शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत. कारण अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी होती. मात्र, त्यापूर्वीच सरकारी खरेदी बंद केली आहे. याच मुद्यावरुन किसान सभा (Kisan Sabha) आक्रमक झली आहे. सरकारने खरेदी केंद्राची मुदत वाढवून पुन्हा सोयाबीन खरेदी सुरू करावी, अन्यथा किसान सभा राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी दिला. तसेच मुदतवाढ न दिल्यास कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार असल्याचेही नवले म्हणाले.
सोयाबीन खरेदी बंद केल्याने अनेक शेतकरी वंचित आहेत. लाखो शेतकऱ्यांचे सोयाबीन पडून आहे. खरेदी केंद्राबाहेर अजूनही शेतकऱ्यांच्या रांगा असल्याचे अजित नवले म्हणाले. सोयाबीन खरेदी बंद झाल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळं सरकारने खरेदी केंद्राची मुदत वाढवून पुन्हा सोयाबीन खरेदी सुरु करावी अशी मागणी अजित नवलेंनी केली आहे. अन्यथा किसान सभा राज्यभर आंदोलन छेडणार असून, कृषीमंत्र्यांच्या घरावर सोयाबीन ओतणार असल्याचा इशारा डॉ. अजित नवले यांनी सरकारला दिला.
नाफडेच्या सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा
बीड (Beed) जिल्ह्यात नाफडेच्या सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी दिवस-रात्र सोयाबीन केंद्राबाहेर ठाण मांडून आहेत. मात्र, अद्याप या सोयाबीनची विक्री झालेली नाही. 6 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत होती. मात्र, ती संपल्यानं पुन्हा मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
बीड जिल्ह्यात नाफेडचे 30 सोयाबीन खरेदी केंद्र
बीड जिल्ह्यात नाफेडचे 30 सोयाबीन खरेदी केंद्र आहेत. या खरेदी केंद्राच्या माध्यमातून अर्ध्या शेतकऱ्यांचे देखील सोयाबीनची खरेदी झालेली नाही. तर 44744 शेतकऱ्यांनी नाफेडकडे नोंदणी केली होती. परंतू, झालेल्या खरेदीतही बारदाना, कडता, हमालीच्या नावावर शेतकऱ्यांची लुट केली जात आहे. त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांचे संपुर्ण सोयाबीन हमीभावाने खरेदी करावे अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जाते आहे.
संपूर्ण राज्यामध्ये सोयाबीन खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असताना काल या सोयाबीन खरेदीची मुदत संपली आहे. त्यानंतर राज्यातील बहुतेक जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला मुदत वाढ मिळण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे.
























