(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dhanteras Diwali 2022 : दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच 'धनत्रयोदशी'; वाचा पूजा करण्याची योग्य पद्धत
Dhanteras Diwali 2022 : धार्मिक मान्यतेनुसार, भगवान धन्वंतरी ऋषी जे आयुर्वेदाचे जनक आहेत. जे आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत. ते या दिवशी धन्वंतरी ऋषींची पूजा करतात.
Dhanteras Diwali 2022 : दिवाळीत (Diwali 2022) जशी नवीन वस्तूंची, कपड्यांची, रंगीबेरंगी दिव्यांची, आकाशकंदीलांची आणि उत्साहाची लगबग पाहायला मिळते. तशीच विविध सणांचीदेखील रेलचेल पाहायला मिळते. दिवाळीमध्ये वसुबारसच्या नंतर दुसरा दिवस असतो तो धनत्रयोदशीचा. आश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी (Dhanteras 2022). या दिवशी धनाची पूजा केली जाते. या दिवशी सोनं खरेदी करणं आणि नवीन कपड्यांची खरेदी करणं शुभ मानले जाते. हिंदू धर्मात हा शुभ दिवस मानला जातो.
धनत्रयोदशी पूजा पद्धत
धनत्रयोदशीच्या पूजेसाठी सर्वप्रथम एका चौरंगावर लाल रंगाचे कापड पसरावे. यानंतर गंगाजल शिंपडून भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या मूर्तीची स्थापना करा. देवासमोर तुपाचा दिवा लावावा. अगरबत्ती लावावी. भगवंताला लाल रंगाची फुले अर्पण करावी. या दिवशी तुम्ही जे काही धातू, दागिने किंवा भांडी खरेदी कराल ते चौरंगावर ठेवा. पूजेदरम्यान "ओम ह्रीं कुबेराय नमः" चा जप करा. धन्वंतरी स्तोत्राचे पठण करावे. लक्ष्मी स्तोत्र आणि लक्ष्मी चालीसा पठण करावे.
आयुर्वेदात महत्त्वाचा दिवस
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान धन्वंतरी ऋषी जे आयुर्वेदाचे जनक आहेत. जे आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत. ते या दिवशी धन्वंतरी ऋषींची पूजा करतात. जेव्हा भगवान धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता. या दिवशी भगवान धन्वंतरी ऋषींची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंती या नावानेही धनत्रयोदशी ओळखली जाते.
आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. लोकांना प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृतत्त्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही. अशी काही जणांची समजूत आहे. कडुनिंबाचे एवढे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
जैनधर्मियांसाठी या दिनाचं महत्त्व
जैनधर्मीय या दिवसाला 'धन्य तेरस' वा 'ध्यान तेरस' म्हणतात. भगवान महावीर या दिवशी 3ऱ्या व 4थ्या ध्यानात जाण्यासाठी योगनिद्रेत गेले होते. तीन दिवसाच्या योगनिद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाणप्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने प्रसिद्ध झाला.