
2024 मध्ये सोन्यानं केला नवा उच्चांक, गुंतवणुकदारांना केलं मालामाल, 2025 मध्ये काय असणार स्थिती?
ऑक्टोबर 2024 पर्यंत सोन्याच्या किंमतीत (Gold Price) 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. जी 40 वर्षातील म्हणजे 4 दशकांतील सर्वोत्तम वाढ आहे. या वर्षात सोन्यानं गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

Gold and silver price: 2024 या वर्षात सोन्यानं (Gold) नव नवीन उच्चांक केले आहेत. ऑक्टोबर 2024 पर्यंत सोन्याच्या किंमतीत (Gold Price) 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. जी 40 वर्षातील म्हणजे 4 दशकांतील सर्वोत्तम वाढ आहे. यानंतर नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सोन्याच्या व्यापारात 5 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. सोन्याच्या दरात वार्षिक 28 टक्के वाढ झाली आहे. म्हणजेच त्याचा परतावा 28 टक्क्यांहून अधिक झाला आहे. दरम्यान, 2025 मध्ये सोन्याची नेमकी काय स्थिती असणार? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
2025 मध्ये सोन्याच्या दरात चढ उतार होण्याची शक्यता
यावेळच्या फेड बैठकीच्या निर्णयानुसार, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे. 2025 साठी देखील व्याजदर कपातीची प्रक्रिया सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर डॉलरच्या दरात वाढ होण्याचा ट्रेंड कायम असून त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. सन 2025 मध्ये मंद आर्थिक धोरणाची शक्यता आहे. त्यामुळं सोन्याच्या किंमतीतही चढ-उतार होण्याची शक्यता आहे. मात्र, जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्याचे दर घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतात सोन्याचा भाव कसा असणार?
2024 मध्ये सोन्यात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळाला आहे. 2024 सारखा सोन्याचा परतावा 2025 मध्ये मिळणार नाही, अस अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी सुरुच
जगातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका सध्या सोने खरेदी करण्यावर आणि त्यांच्याकडील सोन्याचा साठा यावर भर देत आहेत. सोन्याचा साठा मजबूत करुन भू-राजकीय परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ही एक चांगली रणनीती असू शकते. म्हणूनच, जर्मनी, फ्रान्स, चीन आणि भारताच्या मध्यवर्ती बँका देखील त्यांच्या सोन्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ करत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचा चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळं सर्वसामान्य नागरिकांना सोनं घेणं परवड नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला मोठ्या संस्था, श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करताना दिसत आहेत. कारण, सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक नागरिकांना फायद्याची ठरत आहे. कारण दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढतच आहेत. यामुळं सोन्यात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरत आहे. दुसऱ्या बाजदुला सर्वसामान्य लोकांना सोन्याची खरेदी करणं शक्य नाही. त्यामुळं सोन्याच्या किंमती कधी कमी होणार असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
सराफा बाजारातील सोने खरेदीचा ट्रेंड बदलला, ग्राहक करतायेत 'या' नवीन पद्धतीचा अवलंब
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
