Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
टेलिप्राॅम्प्टर बंद पडल्याने मोदींचे भाषण आहे त्याठिकाणीच थांबले. यानंतर ते काही न बोलता शांत राहिले. यानंतर आता विरोधकांनी सुद्धा मोदींच्या भाषणाचा टेलिप्राॅम्प्टर बंद पडल्याने टिप्पणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (05 जानेवारी) साहिबााबाद आणि न्यू अशोक नगर दरम्यान 13 किमी लांबीच्या दिल्ली-गाझियाबाद-मेरठ नमो भारत कॉरिडॉरचे उद्घाटन केले, इतर अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी साहिबााबाद आरआरटीएस स्थानक ते न्यू अशोक नगर आरआरटीएस स्थानकापर्यंत नमो भारत ट्रेनमध्ये प्रवास केला आणि यादरम्यान प्रवाशांशी संवादही साधला. दिल्ली-गाझियाबाद-मेरठ नमो भारत कॉरिडॉरच्या या भागाच्या बांधकामाचा खर्च सुमारे 4,600 कोटी रुपये आहे. या उद्घाटनानंतर दिल्लीला पहिली नमो भारत कनेक्टिव्हिटी मिळाली. याचा फायदा दिल्ली ते मेरठ दरम्यानच्या लाखो प्रवाशांना जलद आणि अधिक आरामदायी प्रवासासह उत्तम सुरक्षितता आणि विश्वासार्हतेसह होईल.
भाषण सुरु असताना टेलिप्राॅम्प्टर बंद पडला
दरम्यान, दिल्ली कार्यक्रमात बोलत असतानाच पीएम मोदीचा भर सभेमध्येच टेलिप्राॅम्प्टर बंद पडला. त्यामुळे भाषण देत असतानाच त्यांना थांबावे लागले. टेलिप्राॅम्प्टर बंद पडल्याने मोदींचे भाषण आहे त्याठिकाणीच थांबले. यानंतर ते काही न बोलता शांत राहिले. यानंतर आता विरोधकांनी सुद्धा मोदींच्या भाषणाचा टेलिप्राॅम्प्टर बंद पडल्याने खोचक शब्दात टिप्पणी केली आहे. भाजपप्रमाणेच मोदीजींचे टेलिप्रॉम्प्टरही दिल्लीत फेल झाल्याची खोचक टिप्पणी आपने मोदींचा व्हिडिओ शेअर करत केली आहे.
दिल्ली में BJP की तरह मोदी जी का Teleprompter भी Fail हो गया.... pic.twitter.com/iqSsx0GZ4K
— AAP (@AamAadmiParty) January 5, 2025
जनकपुरी ते कृष्णा पार्क दरम्यान मेट्रोचे उद्घाटन
दरम्यान, जनकपुरी आणि कृष्णा पार्क दरम्यान सुमारे 1,200 कोटी रुपये खर्चून दिल्ली मेट्रो फेज-4 च्या 2.8 किमी लांबीच्या भागाचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. दिल्ली मेट्रो फेज-4 चा हा पहिला विभाग आहे ज्याचे उद्घाटन करण्यात आले. अधिकृत निवेदनात म्हटले आहे की याचा फायदा कृष्णा पार्क, विकासपुरी, जनकपुरीचा काही भाग आणि पश्चिम दिल्लीतील इतर भागांना होईल.
The teleprompter stopped working in the middle of the speech 🤣🤣🤣 pic.twitter.com/f2P7ZO1Dx0
— Roshan Rai (@RoshanKrRaii) January 5, 2025
पंतप्रधानांनी रिठाळा-कुंडली मेट्रो कॉरिडॉरची पायाभरणी केली
पंतप्रधानांनी दिल्ली मेट्रो फेज-4 च्या 26.5 किमी लांबीच्या रिठाला-कुंडली सेक्शनची पायाभरणीही केली, ज्यासाठी सुमारे 6,230 कोटी रुपये खर्च येईल. हा कॉरिडॉर दिल्लीतील रिठाला हरियाणातील नथुपूर (कुंडली) ला जोडेल, ज्यामुळे दिल्ली आणि हरियाणाच्या उत्तर-पश्चिम भागातील कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल. रोहिणी, बवाना, नरेला आणि कुंडली या प्रमुख क्षेत्रांमध्ये याचा फायदा होईल, ज्यामुळे निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये प्रवेशयोग्यता सुधारेल. हा मेट्रो विभाग सुरू झाल्यानंतर दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रवास करणे सोयीचे होईल, असे निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधानांनी रोहिणी, नवी दिल्ली येथे केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या (CARI) नवीन अत्याधुनिक इमारतीची पायाभरणी केली, जी अंदाजे 185 कोटी रुपये खर्चून बांधली जाईल. निवेदनानुसार, या संकुलात अत्याधुनिक आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या