एक्स्प्लोर
Mutual Fund SIP : म्युच्यूअल फंडमध्ये दरमहा 15000 रुपयांची एसआयपी केल्यास 1 कोटी किती वर्षात जमा होणार? जाणून घ्या
Mutual Fund : दरमहा ठराविक रक्कम एसआयपीद्वारे म्युच्यूअल फंडमध्ये ठेवता येऊ शकतात. या फंडमध्ये नियमितपणे गुंतवणूक करावी लागत असल्यानं बचतीची शिस्त लागते.
म्युच्यूअल फंड एसआयपी
1/5

नोकरदार वर्गाकडून विविध क्षेत्रात गुंतवणूक केली जाते. काही जण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात. काही जण बँकांमध्ये ठेवी ठेवतात. तर, अनेकजण म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक करतात.
2/5

म्युच्यूअल फंडमध्ये दरमहा एसआयपीद्वारे रक्कम गुंतवली जाते किंवा लम्पसम म्हणून ठराविक रक्कम एकाचवेळी म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवता येते. एसआयपीतून नियमित अंतरानं ठराविक रक्कम म्युच्यूअल फंडमध्ये जमा केली जाते
3/5

दरमहा 15000 रुपयांची एसआयपी सुरु केल्यास आणि सीएजीआर 12 टक्के पकडल्यास 1 कोटी रुपये जमा होण्यास 17 वर्षांचा कालावधी लागू शकतो. म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना साधारणपणे 20 टक्क्यांच्या आसपास रिटर्न मिळत आहेत. 20 टक्क्यांच्या सीएजीआरनं 15 हजारांच्या एसआयपीचा विचार केल्यास 13 वर्षात 1 कोटी 11 लाख 43 हजार 139 रुपयांचा कॉर्पस उभा होऊ शकतो.
4/5

15 हजार रुपयांची एसआयपी सुरु केल्यानंतर दर वर्षी 5 टक्के स्टेपअप केल्यास साधारण 15 वर्षात 1 कोटींचा कॉर्पस तयार होऊ शकतो.
5/5

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 03 Jan 2025 06:58 PM (IST)
आणखी पाहा























