एक्स्प्लोर

Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  

Narhari Zirwal : मी म्हणतो 288 चे सभागृह चालवले, मी राज्यही चालवू शकतो, अशा मिश्किल शब्दात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिकराज्यातील जनतेचं मत होतं कि आदिवासी विकास मंत्री हा आदिवासी समाजाचाच व्हायला हवा होता. प्रचारादरम्यान मी सांगीतलं होतं कि आदिवासी आहे म्हणून आदिवासी मंत्री बनवायचं का? तसं मी कुठलेही मंत्रीपद सांभाळू शकतो. त्यानंतर महायुतीच्या सगळ्याच नेतेमंडळीनी, देवेंद्र फडणवीससह अजित पवार यांनी देखील अन्न औषध प्रशासन हे खाते मला दिले, ते मी महत्त्वाचं खातं म्हणून बघतो. या खात्यात मनुष्यबळ कमी आहे. साधने नाहीत टेस्टिंग लॅब फक्त तीन आहे आणि अनेक चॅलेंज आहेत. यामुळे विनोदा खातिर मी म्हणतो 288 चे सभागृह चालवले, मी राज्यही चालवू शकतो, अशा मिश्किल शब्दात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्य चालवायला चांगल्या खात्याचा मंत्री झालं असं होत नाही. खाती कोणतीही वाईट नाही. सगळी खाती जनतेसाठी निर्माण केलेली आहे. हे खाते देखील मला मुख्यमंत्र्यासारख वाटतं असेही ते म्हणाले.

अजित पवार आणि  शरद पवार एकत्र आले तर....  

शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील याची चर्चा आहे. याबद्दल काय होईल ते सांगता येणार नाही. माझी भूमिका महायुती बरोबर आहे आणि त्यांच्याबरोबरच राहणार. अजित पवार व शरद पवार एकत्र आले तर चांगलेच होईल. राजकारण काही दिवसापुरते आहे. मात्र वैयक्तिक संबंध आपले असतात, सकाळ संध्याकाळ ते पक्ष म्हणून राहत नाही. पालकमंत्री संदर्भात बोलायचे झाले तर  13 जिल्ह्यात आदिवासी भाग आहे. त्यापैकी समाज काही ठिकाणी मागे आहे आणि त्यासाठी गोंदिया, नंदुरबारसारखे कुठेही पालकमंत्री उद्या अशी मागणी माझी असल्याचे ही मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले. 

साई संस्थानाच्या प्रसादाबाबत असं बोलणं योग्य- नरहरी झिरवाळ  

साई संस्थानाच्या प्रसादालयातलं मोफत जेवण बंद करा. अशी मागणी माजी खासदार सुजय विखेंनी साई संस्थान प्रशासनाकडे केली आहे. जे पैसे अन्नदानात जातात ते पैसे आमच्या मुला- मुलींच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावा अशी मागणी सुजय विखेंनी केली आहे. अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय, महाराष्टातील सगळे भिकारी इथे गोळा झालेत, हे योग्य नाही. असेही सुजय विखे म्हणालेत. यावर बोलतांना मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की,  भाविक श्रद्धा म्हणून प्रसाद त्या ठिकाणी घेतात, याचा अर्थ भिकारी होत नाही. जे दानशूर आहे तेही लाईनमध्ये उभे राहून प्रसाद घेतात. त्यामुळे असं बोलणं योग्य नसल्याचे ते म्हणाले.

आणखी वाचा 

Suresh Dhas : आकाचे आका करलो जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी; सुरेश धस यांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, अजितदादा क्या हुवा तेरा वादा...

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget