Mutual Fund : 2024 मध्ये SIP केली पण गणित चुकलं, 34 इक्विटी म्युच्यूअल फंड्समधील गुंतवणुकीवर नफ्याऐवजी तोटा, यादी एका क्लिकवर
Investment News : 2024 मध्ये 34 फंड्स असे होते, ज्या म्युच्यूअल फंडमध्ये एसआयपी करुन देखील परतावाच मिळाला नाही. तर, जी रक्कम गुंतवली त्यापेक्षाही रक्कम कमी झाली.
मुंबई : सिस्टीमेटिक इन्वेस्टमेंट प्लॅन म्हणजे गुंतवणूकदारांकडून दरमहा ठराविक रक्कम म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवली जाते. म्युच्यूअल फंडमधील गुंतवणुकीतून साधारणपणे 12 टक्के सीएजीआरनं परतावा मिळतो असं मानलं जातं. मात्र, काही वेळा काही म्युच्यूअल फंडमधील गुंतवणूक नफ्याऐवजी तोट्याची ठरते. 2024 मध्ये बऱ्याच म्युच्यूअल फंडमधील गुंतवणुकीबाबत असंच झालं आहे. आहे. 2024 मध्ये इक्विटी म्युच्यूअल फंडमध्ये जवळपास 34 फंडांनी परतावा देणं दूर राहिलं. गुंतवणूकदारांचं नुकसानचं झालं.
कोणत्या म्युच्यूअल फंडमधील गुंतवणूक तोट्यात
द इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार 2024 मध्ये 425 इक्विटी म्युच्यूअल फंडांपैकी 34 फंड असे होते ज्यांनी गुतंवणूकदारांना चांगला परतावा दिला नाही. या फंडमधील गुंतवणूक त्यांच्यासाठी तोट्याची ठरली. तीन इक्विटी म्युच्यूअल फंडांनी निगेटिव्ह परतावा दिला.
क्वांट पीएसयू फंडाची कामगिरी सर्वाधिक खराबर राहिली. या फंडातील गुंतवणुकीचा परतावा (एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न) -20.28 टक्क्यांवर गेला. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदारानं 10 हजार रुपये दरमहा एसआयपी केली असेल तर त्याची गुंतवणूक सध्या 120000 रुपयांऐवजी 90763 रुपये झाली.
दुसऱ्या स्थानावर क्वांट इएलएसएस टॅक्स सेव्हर फंडनं देखील परतावा (एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न) -11.88 टक्क्यांवर गेला. आदित्य बिर्ला एसएल पीएसयू इक्विटी फंडमधील गुंतवणूक (एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न) -11.13 टक्क्यांवर गेला आहे. म्हणजेच या तीन म्युच्यूअल फंडमधील गुंतवणूक नफ्याऐवजी तोट्यात राहिली.
दुसऱ्या कोणत्या म्युच्यूअल फंडांतील गुंतवणूक तोट्यात
क्वांट कन्झम्पशन फंड : -9.66%
क्वांट क्वांटामेंटल फंड: -9.61%
क्वांट फ्लेक्सी कॅप फंड: -8.36%
क्वांट बीएफएसआय फंड: -7.72%
क्वांट एक्टिव्ह फंड: -7.43%
क्वांट फ्लेक्सी फंड: -6.39%
क्वांट मिड कॅप फंड: -5.34%
क्वांट लार्ज अँड मिड कॅप फंड: -4.54%
सेक्टोरल फंड्स ने कितना डुबाया
2024 मध्ये विभागनिहाय फंडमधील म्युच्यूअल फंडमधील गुंतवणूक तोट्यात
यूटीआय ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक्स फंड : -4.05%
क्वांट लार्ज कॅप फंड: -3.74%
क्वांट मुव्हमेंटम फंड: -3.35%
एसबीआय इक्विटी मिनिमम वेरियन्स फंड : -3.06%
एचडीएफसी एमएनसी फंड: -1.51%
टारस मिड कॅप फंड: -1.45%
PSU म्युच्यूअल फंडातील गुंतवणुकीची काय स्थिती?
आयसीसी प्रू पीएसयू इक्विटी फंड : -0.86%
एसबीआय पीएसयू: -0.67%
क्वांट बिझनेसेस सायकल फंड : -0.66%
बडोदा बीएनपी परिबस फंड : -0.62%
या फंडमधील गुंतवणूक देखील तोट्यात राहिली.
टाटा इन्फ्रास्ट्रक्चर फंड: -0.05%
इन्वेस्को इंडिया पीएसयू इक्विटी फंड : -0.04%
गुंतवणूकदारांसाठी 2024 निराशाजनक
ET Mutual Funds ने जानेवारी 2024 ते 24 डिसेंबर 2024 मध्ये सर्व इक्विटी म्युच्यूअल फंड्स (रेग्यूलर आणि ग्रोथ स्कीम्स)च्या कामगिरीचा अहवाल तयार केला. बाजारातील अनिश्चितता आणि विविध क्षेत्रातील घसरण यामुळं 2024 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी आव्हात्मक राहिलं.
दरम्यान, तज्ज्ञांच्या मते, तुम्ही जर दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करुन गुंतवणूक करत असाल घाबरण्याची गरज नाही. बाजारातील चढ उतार याचा सामना करत एसआयपीतून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
इतर बातम्या :