एक्स्प्लोर
IPO Update : पैसे तयार ठेवा, येत्या आठवड्यात 3 आयपीओ येणार,गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या GMP नेमका किती?
IPO Update : भारतीय शेअर बाजारात येत्या आठवड्यात तीन आयपीओ येणार आहेत. या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कमाईची संधी आहे.

बिझनेस न्यूज
1/5

भारतीय शेअर बाजारात येत्या आठवड्यात एक मेनबोर्ड आयपीओ आणि दोन एसएमई आयपीओ येणार आहेत. डिसेंबर महिन्यात 20 आयपीओ लाँच झाले आहेत. गुंतवणूकदारांना जवळपास सर्व आयपीओंनी चांगला परतावा दिला आहे.
2/5

इंडो फार्म इक्विपमेंट आयपीओ 31 डिसेंबरला बोली लावण्यासाठी खुला होईल. तर, बोली लावण्याची अंतिम तारीख 2 जानेवारी आहे. हा आयपीओ 86 लाख इक्विटी शेअर नव्यानं जारी करणार आहे. तर, 35 लाख इक्विटी शेअर ऑफर फॉर सेलद्वारे विकले जाणार आहेत. आयपीओचा जीएमपी 80 रुपयांवर असून ज्यांना हा आयपीओ अलॉट होईल त्यांना 38 टक्के नफा मिळू शकतो.
3/5

टेक्नीकेम ऑर्गेनिक्स या कंपनीचा आयपीओ हा एसएमई आयपीओ आहे. हा आयपीओ देखील 31 डिसेंबरला गुंतवणुकीसाठी खुला होईल, 2 जानेवारीपर्यंत यात बोली लावता येईल. या आयपीचा किंमतपट्टा 52-55 रुपये प्रतिशेअर आहे. एका लॉटमध्ये 2 हजार शेअरचा समावेश असेल. 25.25 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी हा आयपीओ येईल. याचा जीएमपी 11 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा मिळाले.
4/5

लिओ ड्रायफ्रुटस अँड स्पायसेसचा आयपीओ 1 ते 3 जानेवारी दरम्यान बोली लावण्यास खुला असेल. आयपीओचा किंमतपट्टा 51-52 रुपये आहे. 25.12 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी हा आयपीओ येईल. या आयपीओच्या एका लॉटमधध्ये 2 हजार शेअर असतील. गुंतवणूकदारांना किमान 104000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
5/5

दरम्यान, भारतीय शेअर बाजारात वेंटीव हॉस्पिटलिटी, सेनोरेस फार्मा, कॅराराओ इंडिया या कंपन्यांचे आयपीओ लिस्ट होणार आहेत. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 29 Dec 2024 06:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
