Apara Ekadashi 2024 : 2 की 3 जून? अपरा एकादशी नेमकी कधी आहे? अचूक तिथी, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
Apara Ekadashi 2024 : वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी म्हणतात. सुख-सौभाग्याच्या प्राप्तीसाठी अपरा एकादशीचं व्रत महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी भगवान विष्णूची विधीवत पूजा केली जाते.
Apara Ekadashi 2024 : वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी (Apara Ekadashi) असं संबोधलं जातं. यंदा अपरा एकादशी रविवारी, 2 जून रोजी साजरी होणार आहे. या दिवशी भगवान विष्णूची विधीवत पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. या एकादशीचं व्रत केल्याने मनातील सर्व प्रकारची भीती दूर होते आणि भूतप्रेतबाधेपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. यासोबतच या एकादशीच्या व्रताने सुख, समृद्धी आणि सौभाग्यही लाभतं. या एकादशीची तिथी, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया.
अपरा एकादशी 2024 तिथी (Apara Ekadashi 2024 Tithi)
हिंदू कॅलेंडरनुसार, अपरा एकादशी रविवारी, 2 जून 2024 रोजी पहाटे 5 वाजून 4 मिनिटांनी प्रारंभ होईल आणि दुसऱ्या दिवशी 3 जून रोजी पहाचे 2 वाजून 41 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार, अपरा एकादशी व्रत 2 जून रोजी केलं जाणार आहे.
अपरा एकादशी 2024 शुभ मुहूर्त (Apara Ekadashi 2024 Shubh Muhurta)
यावेळी रविवारी अपरा एकादशीला आयुष्मान योग जुळून आला आहे. या शुभ योगात उपवास केल्याने अनेक पटींनी अधिक फल प्राप्त होतं. या दिवशी सकाळी 5 वाजून 23 मिनिट ते दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी आयुष्मान योगात पूजा करणं लाभदायक ठरेल.
अपरा एकादशी 2024 पारण वेळ
हिंदू कॅलेंडरनुसार, अपरा एकादशीचा उपवास सोमवार, 3 जून, 2024 रोजी सकाळी 08:05 ते 08:10 या वेळेत सोडता येईल.
अपरा एकादशी 2024 महत्त्व (Apara Ekadashi 2024 Significance)
अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्याने शुभ फल प्राप्त होतं. या दिवशी भगवान विष्णूसह लक्ष्मी आणि सूर्यदेवाची पूजा करणं शुभ मानलं जातं. या दिवशी भगवान विष्णूची योग्य प्रकारे पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्यासोबतच संपत्ती वाढते.
विष्णुमूल मंत्र
ॐ नमो नारायणाय ॥
भगवते वासुदेवाय मंत्र
ओम नमो: भगवते वासुदेवाय
विष्णु गायत्री मंत्र
ओम श्री विष्णुवे च विद्महे वासुदेवाय धीमही । तन्नो विष्णुः प्रचोदयात् ।
श्री विष्णु मंत्र
मंगलम् भगवान विष्णु, मंगलम् गरुध्वज.
मंगलम् पुंद्रीक्षा, मंगलय तनो हरी ।
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :