Shani Jayanti 2024 : शनि जयंती मेषसह 'या' 5 राशींसाठी ठरणार अशुभ; नोकरी-व्यवसाय आणि प्रेमसंबंधातही येणार अडचणी, चौफेर हानी
Shani Jayanti 2024 : हिंदू पंचांगानुसार, या वर्षी 6 जूनला शनि जयंती आहे, या तारखेला न्याय देवता शनिदेवाचा जन्म झाला. शनि जयंतीला होत असलेल्या राहू आणि शनीच्या भेटीमुळे द्वादश योग तयार होत आहे. परंतु, शनि जयंतीचा दिवस मेष राशीसह 5 राशींसाठी अशुभ ठरेल.
![Shani Jayanti 2024 : शनि जयंती मेषसह 'या' 5 राशींसाठी ठरणार अशुभ; नोकरी-व्यवसाय आणि प्रेमसंबंधातही येणार अडचणी, चौफेर हानी Shani Jayanti 2024 is unlucky for these zodiac signs Will Face Issues In Finances Get Trouble In Personal Life Know Shani Jayanti Negative Impact On 5 Zodiac Signs Shani Jayanti 2024 : शनि जयंती मेषसह 'या' 5 राशींसाठी ठरणार अशुभ; नोकरी-व्यवसाय आणि प्रेमसंबंधातही येणार अडचणी, चौफेर हानी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/17/554fa45e81c81b5646d7557af8bb4a211715960220001499_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shani Jayanti 2024 : शनीचं नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते आणि याचं कारण म्हणजे, शनि ज्या राशीत असेल त्या राशीला तो बहुतेक अशुभ फल देतो. अवघ्या काही दिवसांत शनि जयंती येत आहे. या वर्षी शनि जयंतीच्या दिवशी काही राशींवर शनीचा प्रकोप दिसून येईल. शनि जयंती (Shani Jayanti 2024) या वर्षी गुरुवारी, म्हणजेच 6 जूनला आहे.
यंदा शनि जयंतीच्या दिवशी शनि आणि राहूच्या मिलनामुळे द्वादश योग तयार होत आहे. यासोबतच मंगळ 1 जून रोजी मेष राशीत प्रवेश करेल, अशा वेळी मंगळावर शनीच्या राशीमुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल. देशात आणि जगात अनेक नकारात्मक घटना घडतील, ज्याचा प्रभाव महिनाभर राहील. काही राशींसाठी देखील शनि जयंती शुभ ठरणार नाही. शनि जयंती नेमकी कोणत्या राशींसाठी अशुभ? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांना या काळात कोणताही निर्णय सावधगिरीने घ्यावा. विशेषतः पैशाच्या व्यवहाराशी संबंधित निर्णय घेणं टाळावं. गुंतवणुकीच्या बाबतीतही काळजी घ्या. यावेळी तुम्ही कोणतंही ऑपरेशन करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, अन्यथा व्याधी वाढतील. त्याच वेळी, या महिनाभराच्या काळात मेष राशीच्या लोकांनी वाहन चालवणं देखील टाळावं.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रतिकूल आहे. या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कर्क राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव असतो, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांच्या मनात अनेक प्रकारची नकारात्मकता येऊ शकते. या काळात तुम्हाला कौटुंबिक निर्णय घेताना त्रास होऊ शकतो. विशेषत: आईची तब्येत या दिवसात चांगली राहणार नाही.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांनी या काळात जर एखादा व्यवसाय सुरू करण्याची योजना आखली असेल तर त्यांनी थोडं थांबावं. शनीच्या प्रतिकूल परिणामामुळे कोणतेही मोठे निर्णय घेणं टाळावं. नवीन व्यवसाय सुरू करणं टाळलं पाहिजे. त्याच वेळी, नोकरदारांनी देखील आत्ताच नोकरी बदलण्याचा निर्णय घेऊ नये. कौटुंबिक गुंतागुंत होईल. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत काळजी घ्या, समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांनी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं टाळावं. आर्थिक बाबतीत हा काळ चांगला नाही. त्याच वेळी, जर आपण आरोग्याबद्दल बोललो तर, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं, त्यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबातील काही वादामुळे तुम्हाला टेन्शन येईल, अशा वेळी तणाव टाळणं खूप महत्त्वाचं आहे.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ नाही. या काळात तुम्हाला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. डोकेदुखी, मायग्रेन यासारख्या समस्यांमुळे गोंधळ होऊन तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकणार नाही. तुमचं मन विचलित राहू शकतं. तुम्ही राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवा, हे तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवेल. या काळात कोणतेही मोठे निर्णय घेणं टाळावं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)