![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Manoj Jarange On Chhagan Bhujbal :तुम्ही लोकांचं खाता म्हणून जेलमध्ये जाता,भुजबळांच्या टीकेला उत्तर
Manoj Jarange On Chhagan Bhujbal : तुम्ही लोकांचं खाता म्हणून जेलमध्ये जाता, भुजबळांच्या टीकेला जरांगेंचं उत्तर
सांगली : छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. मराठा समाजाने आता ठरवले आहे, आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही. त्यांना तेच काम उरले आहे. लोकांचे खाल्ल्याने ते आतमध्ये जाऊन आले आहेत. कोण कुणाचे खात आहे सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलू नाहीत. तुम्ही टीका केली तर, तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही कच्चे नाहीत. या राज्यात आम्ही वातावरण खराब होऊ देणार नाही. आता आम्ही देखील 50 टक्के आहे. लोकांचे पैसे खाता, रक्त पिता का? मग तुम्हाला कोण देव मानणार आहे. वयाने तुम्ही मोठे आहेत. आम्हाला काढायला लावू नयेत. आम्ही देखील तुमचा बायोडेटा काढला आहे. धमक्या देऊ नयेत, असे जरांगे म्हणाले.
टीका करण्याचं कामच त्यांना आहे. त्यामुळे त्यांना महत्त्व द्यायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे. त्यामुळे यापुढे त्यांना महत्त्व देणार नाही. राहुल गांधींनी विजय वेडट्टीवार यांना विरोधी पक्षनेता मराठ्यांच्या मुलांचं वाटोळं करण्यासाठी दिले आहे. त्यामुळे त्याप्रमाणे ते बोलत असतील. तर, पंकजा मुंडे यांना गोरगरिबांची जाण आहे. गोपीनाथ मुंडे यांनी गोरगरिबांचे कल्याण करण्यासाठी काम केलं आहे. त्यामुळे त्या या सभेला आल्या नसतील असेही जरांगे म्हणाले.
![Vishal Patil on Manoj Jarange : लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं बदला घेतला - विशाल पाटील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/2bc372a3693471c60d70bd5617c84c341719124934389719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Vijay Wadettiwar on Vishwajeet Kadam : वादात न पडता विधानसभेच्या तयारीला लागा : विजय वडेट्टीवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/e8f54f32919a6659fd50afcf0b23f0d71718426531046718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sangli Heavy Rain : सांगली जिल्ह्यात तासगावात ढगफुटीसदृश्य पाऊस, ओढे, नद्यांना पूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/9f0874b36d785f701b78c4e64e4028f91718337167094718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Jayant Patil Sangli : सांगली लोकसभेत काही गोष्टींवरून माझ्याबाबत समज-गैरसमज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/557dd39cc0fabaa8a33ac2da7a6379541718335925629718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sangli Fake Currency ; तुमच्या खिशातही बनावट नोट? 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/5f5d68c11ce0ddd19378348546d7ea7a171824880862390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)