Pune Drugs News : पुण्यातील उच्च शिक्षित तरुण ड्रग्सच्या विळख्यात
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यातील तरुणाईला मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा विळखा पडल्याचे समोर आलंय.. पुण्यात डिलिव्हरी अँपवरून एलएसडी ड्रग्सची तस्करी होत असल्याचं समोर आलंय. ड्रग्स खरेदी करणाऱ्यांमध्ये एमबीए, बीबीए, एलएलबी आणि आयटी इंजिनिअरचा समावेश असल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी पाच उच्च शिक्षितांना बेड्या ही ठोकल्या आहेत. कोथरूड येथे राहणाऱ्या आणि एमबीएचं शिक्षण घेणाऱ्या रोहन गवईला पुणे पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यानंतर बाणेर, पिंपळे सौदागर, वाकड आणि सिंहगड रोड परिसरात छापे टाकून त्याच्या साथीदारांनाही बेड्या ठोकल्या. 24 आणि 25 मे च्या धाडसत्रात एकूण पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आणि त्यांच्याकडून एक कोटी चौदा लाखांचं एलएसडी ड्रग्स जप्त करण्यात आलं.