एक्स्प्लोर

Pune Metro Protest | शरद पवारांचे कार्यकर्ते मेट्रो स्टेशनमध्ये घुसले, पोलिसांची धरपकड, काही आंदोलक पोलिसांच्या अंगावर आले..नेमकं काय घडलं?

Pune Metro Protest | शरद पवारांचे कार्यकर्ते मेट्रो स्टेशनमध्ये घुसले, पोलिसांची धरपकड, काही आंदोलक पोलिसांच्या अंगावर आले..नेमकं काय घडलं?

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, विविध मागण्यासाठी कार्यकर्ते मेट्रोच्या रूळावर उतरले आहेत. तरुणांना रोजगार मेळावा यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पुण्यातल्या पुणे महानगरपालिका मेट्रो स्थानकामधील मेट्रो ट्रॅकवर उतरून आंदोलन करण्यात आल आहे. या आंदोलनामुळे गेल्या एक तासापासून मेट्रो ही खोळंबली आहे. पोलीस या आंदोलनकर्त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न करतायेत यासाठी आणखीन पोलीस बळ देखील बोलवण्यात आलं आहे. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हे सगळे कार्यकर्ते मेट्रो ट्रॅकवर उतरून आंदोलन करण्यात येत आहे. मेट्रोमध्ये तरुणांना रोजगार मिळावा, या मागणीसाठी शरद पवार गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाकडून पुणे महानगरपालिकेच्या जवळील मेट्रो स्टेशन च्या ट्रॅकवर उभा राहून आंदोलन करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत आहे. या आंदोलनानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे अॅक्शन मोडवरती आले आहेत. मेट्रो रुळावर आंदोलन करून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या आंदोलकांची पार्टीतून तात्काळ हकालपट्टी करणार असल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष नरेंद्र पावटेकरांसह काही कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल आहे

काय म्हणाले शहराध्यक्ष प्रशांत जगताप?

याबबात माहिती देताना शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, पक्षाला विश्वासात न घेताच हे स्टंटबाजीचं आंदोलन परस्पर केलं होतं. आंदोलकांनी पोलिसांवरही हात उचलल्याचा आंदोलकांवर आरोप आहे. या घटनेनंतर आंदोलनात असणाऱ्या कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नरेंद्र पावटेकर असं या स्टंटबाज आंदोलकाचं नाव असल्याचं देखी जगताप यांनी सांगितलं आहे.

आज पुणे मेट्रो परिसरात नरेंद्र पावटेकर नावाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं हा कार्यकर्ता तीन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातून आमच्या पक्षात आला आहे. मागच्या तीन महिन्यात तो पक्षात कुठेही सक्रिय नाही. आज त्यांनी ज्या आंदोलन केलेला आहे त्याचा आणि पक्षाचा काहीच संबंध नाही. त्याने पक्षाला विचारून किंवा पक्षाला सांगून हे आंदोलन केलेले नाही. त्यामुळे आज जे काही आंदोलन करण्यात आलेला आहे त्यामध्ये जे काही नुकसान झाले आहे किंवा पोलिसांची वाद झाला आहे प्रशासनासोबत वाद झाला आहे याचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी काही संबंध नाही. हे मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासोबत चुकीच्या पद्धतीने वाद घातले आहेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे, मी नरेंद्र पावटेकर या कार्यकर्त्याच्या हकालपट्टी करत आहे. ती करत असताना मी सांगू इच्छितो, पक्षाला सांगून किंवा पक्षाची परवानगी घेऊन कार्यकर्ता आंदोलन करेल तरच ते आंदोलन अधिकृत समजण्यात यावं, आजचा आंदोलन हे पक्षाचं आंदोलन नाही, या चुकीच्या कृतीची पक्षपाठ राखण करणार नाही, या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो यासंदर्भात नरेंद्र पावटेकर याची हकालपट्टी करतो, असेही प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केला आहे

पुणे व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Price Hike: साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं माजी साखर आयुक्तांनी कारण सांगितलं, म्हणाले...
साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं कारण काय? माजी साखर आयुक्त म्हणाले...
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Embed widget