(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 1 PM : 16 नोव्हेंबर 2024: ABP Majha
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 1 PM : 16 नोव्हेंबर 2024: ABP Majha
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता जवळपास अंतिम टप्प्यात येत आहे. अशातच प्रचारादरम्यान मोठ्या टिकेची झोड उडताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर प्रचारसभेवेळी शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खरमरीत टीका केली आहे. कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे अपघातप्रकरणी जयंत पाटलांनी सुनील टिंगरेंना लक्ष्य केलं आहे. श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
एखाद्या आमदाराने गरिबासाठी रात्र काढली तर त्याचे कौतुक होतं. मात्र, हे आमदार श्रीमंताच्या मुलाचे चोचले पुरवण्यासाठी एखाद्या नोकरासारखी रात्रपाळी करत बसले होते. अशा आमदाराला आता घरी बसवा अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वडगावशेरीचे विद्यमान आमदार जहरी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी जयंत पाटील यांची आज धानोरीत जाहीर सभा पार पडली. या सभेत जयंत पाटील यांनी सुनील टिंगरे यांचा चांगलाच समाचार घेतला.