TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 25 December 2024 ABP Majha
गडचिरोलीचं पालकत्व स्वत:कडे ठेवावं ही इच्छा, पण निर्णय शिंदे आणि पवारांसोबत चर्चा करुन, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, पालकमंत्रिपदाचा समन्वय बावनकुळेंकडे
विधानसभेत ट्वेण्टी ट्वेण्टी खेळून विश्वचषक जिंकलो मात्र राज्य कारभार टेस्ट मॅचसारखा करणार, निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांवर मुख्यमंत्र्यांचं भाष्य, जानेवारीत कोर्टात सुनावणी, प्रकरण निकाली निघण्यासाठी प्रयत्न करणार
सायबर फ्रॉड सरकारसमोरचं मोठं आव्हान, मुख्यमंत्र्यांची कबुली, खोट्या पोस्ट फॉरवर्ड करणारेही तेवढेच जबाबदार, नागपुरात फडणवीसांचा इशारा
भाजप कोअर कमिटी बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीबाबत रणनीती...मुंबई महापालिकेत १५० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार...तर नवीन वर्षात सदस्य नोंदणी अभियान...
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कायदा करणार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची नाशकात घोषणा, येत्या अधिवेशनातच विधेयक
दिल्लीत एनडीएची बैठक संपन्न, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दांडी, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदार प्रतापराव जाधवांची हजेरी