एक्स्प्लोर

दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले

दिशा सालियन प्रकरणावरुन आज विधिमंडळ सभागृहात आमदारांनी वेलमध्ये उतरुन गोंधळ सुरु केल्याचे दिसून आले.

मुंबई : दिशा सालियन प्रकरणावरुन विधिमंडळ सभागृहात सत्ताधारी आमदार (MLA) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दिशाचे वडिल सतिश सालियन यांच्या वकिलाने पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याच अनुषंगाने आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिशा सालियन प्रकरणावरुन गदारोळ पाहायला मिळालं. सत्ताधारी आमदारांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या चौकशीची मागणी करत त्यांच्या आमदारकीचा राजीनामाही घेण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे विरोधी पक्षातील आमदारांनी हे प्रकरण 5 वर्षे जुनं असून विनाकारण राजकारण केलं जात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, दिशा सालियनप्रकरणावरुन विधानपरिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार भावना गवळी यांनी आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे.  

दिशा सालियन प्रकरणावरुन आज विधिमंडळ सभागृहात आमदारांनी वेलमध्ये उतरुन गोंधळ सुरु केल्याचे दिसून आले. दिशा सालियान यांच्या वडिलांनी दिशाच्या हत्येत आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे जसा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, तसा आदित्य ठाकरे राजीनामा देणार का? असा प्रश्न शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी विचारला आहे. 

विधानसभेत कदम-सरदेसाई भिडले

विधानसभेत आमदार राम कदम यांनीही दिसा सालियनचा मुद्दा उपस्थित केला. सुशांतसिंग राजपूतचा जिथं मृत्यू झाला, तो फ्लॅट उद्धव ठाकरे सरकारने लगेच का परत केला. रिया चक्रवर्तीचे प्रवक्ते हे उबाठाचे नेते आहेत. सुशांतसिंग मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे सरकारची काय भूमिका, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आमदार कदम यांनी केली. तर, काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी ही 5 वर्षांपूर्वीची घटना आहे, असे म्हणत चर्चा करण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. मगाशी एक सदस्य या विषयावर बोलले, ⁠मंत्री बोलले, ⁠परत आता तोच विषय काढला जातो. पण, ही ⁠5 वर्षापूर्वीची घटना आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले. राम कदम यांनी ड्रामा करुन सांगितलं, केंद्र सरकारकडे सीबीआय आहे, त्यांनी चौकशी केली आणि क्लिनचीट दिली. मग सीबीआयवरती आपला आरोप आहे का? आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असे आमदार वरुण सरदेसाई यांनी म्हटले. 

आरोपांची चौकशी केली जाईल - कदम

सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरेंवर जे काही आरोप केले आहेत, त्याची चौकशी केली पाहिजे. त्यासाठी, आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी आमदार भावना गवळी यांनी विधानपरिषदेत केली. तर, आदित्य ठाकरे हे विधिमंडळ सदस्य आहेत, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आहेत. 5 वर्ष पूर्वीचे एक प्रकरण आहे. त्या प्रकरणातील जी मुलगी आहे, तिच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. 

आम्हाला उद्धव ठाकरेंचीच शिकवण

या प्रकरणात दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई पोलीस यांची भेट घेतली आहे,  ⁠या संदर्भात चौकशी केली जाईल. सर्व संबंध तपासले जातील. पाच वर्षांपूर्वी उघड झालं नाही ते आता उघड होत असेल तर न्याय दिला पाहिजे, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले. तसेच, उद्धव ठाकरे साहेब यांनी आम्हाला सांगितल होतं, ⁠माता बहिणींवरती अन्याय करायचा नाही, ती शिकवण अजूनही कायम आहे. म्हणून, त्या महिलेला न्याय दिला पाहिजे, असेही मंत्री देसाई यांनी म्हटले. 

नितेश राणेंनी दिला तलवार केसचा दाखला

सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला नाही, असाच प्रकार आरुषी तलवार बाबतीत झाला होता. कोर्टाने तोही नाकारला होता, पण त्यानंतर झालेल्या तपासात आरोपी पकडले व शिक्षा झाली. तेव्हाच्या सरकारने 72 दिवस सीबीआयला प्रवेश करून दिला नव्हता. चुकीची माहिती पटलावर जाऊ नये, काही अज्ञानी लोकांनी माहिती घेऊन बोलावे, असे नितेश राणे यांनी म्हटले. 

हेही वाचा

मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
Ajit Pawar : अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
Katrina Kaif Visited Pakistan: कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल
कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल
आम्ही मरावं का? चाचांचं लग्न पाहून व्हायरल फोटोवर तरुणांचा कमेंटचा पाऊस, नव्या नवरीच्या सौंदर्याचं कौतुक! Video
आम्ही मरावं का? चाचांचं लग्न पाहून व्हायरल फोटोवर तरुणांचा कमेंटचा पाऊस, नव्या नवरीच्या सौंदर्याचं कौतुक! Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar on Anna Bansode : आण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, कौतुक करता करता गुपितच फोडलं!ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 26 March 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सAnna Bansode Vidhansabha Deputy Speaker: अण्णा बनसोडे विधानसभा उपाध्यक्षपदी,प्रस्ताव एकमताने समंतNagpur : नागपूरच्या हिंसाचारात दशक्रियेसाठी आलेल्या कुटुंबातील 10 जणांना अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
Ajit Pawar : अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
Katrina Kaif Visited Pakistan: कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल
कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल
आम्ही मरावं का? चाचांचं लग्न पाहून व्हायरल फोटोवर तरुणांचा कमेंटचा पाऊस, नव्या नवरीच्या सौंदर्याचं कौतुक! Video
आम्ही मरावं का? चाचांचं लग्न पाहून व्हायरल फोटोवर तरुणांचा कमेंटचा पाऊस, नव्या नवरीच्या सौंदर्याचं कौतुक! Video
पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक नाही, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही : संभाजीराजे
पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक नाही, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही : संभाजीराजे
Warren Buffett : भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण घरची सून जगप्रसिद्ध 'टायगर'सोबत अफेअरमध्ये अडकली! पोस्ट शेअर करत म्हणाला..
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण घरची सून जगप्रसिद्ध 'टायगर'सोबत अफेअरमध्ये अडकली! पोस्ट शेअर करत म्हणाला..
Embed widget