Special Report on Beed Crime : बीड हत्येचं प्रकरण, कोण आहेत वाल्मीक कराड?
Special Report on Beed Crime : बीड हत्येचं प्रकरण, कोण आहेत वाल्मीक कराड?
जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात उद्या बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. सोशल माध्यमावर याबाबतचे जाहीर आवाहन संघटनांकडून करण्यात आले आहे. मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीय. परंतु या घटनेतील मुख्य सूत्रधाराला अटक करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्ह्यातील संघटनांकडून केली जात आहे. त्याच पार्श्भूमीवर बीड जिल्हा बंद पुकारला आहे. तर दुसरीकडे बीड (Beed) जिल्ह्यातील राजकीय वातावरणही या घटनेवरुन तापलं असून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन खून करण्यात आला. या प्रकरणात विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले आरोपींमध्ये आहेत. आता, पवनचक्की कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्यावरुन केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे, या दोन्ही घटनांचं कनेक्शन आहे का, याचा तपास पोलीस करत आहे. दरम्यान, 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक मुंडे यांचंही नाव असून त्यांच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे संतोष देशमुख अपहरण व खून प्रकरणारुन बीडमधील राजकीय व सामाजिक वातावरण तापलं असून विविध संघटनांनी बीड बंदची हाक दिली आहे.
सुत्रधारास अटक करण्याची मागणी
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मसाजोग ग्रामस्थांसह देशमुख कुटुंबीयांकडून तब्बल 12 तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले. दरम्यान, पोलिसांनी तीन आरोपींना अटकही केली आहे. मात्र, मुख्य सुत्रधारास अटक करण्यात यावी, अशी मागणई करत उद्या बीड जिल्हा बंद पुकारण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
मराठा, ओबीसी,धनगर समाजाचे आरक्षण मागणी अनुषगांने आंदोलने चालू आहेत तसेच 16 डिसेंबर 2024 पासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे.याचं अनुषंगाने विविध राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने त्यांच्या न्याय मागण्यासाठी विविध प्रकारचे निदर्शने आंदोलने होण्याची शक्यता लक्षात घेता.अचानक घडणाऱ्या घटनावरुन व किरकोळ कारणावरुन तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता मनाई आदेश जारी करण्यात आले असल्याचे बीडचे अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी प्रसिध्दी पत्रकद्रारे कळवले आहे.दि.13 डिसेंबर 2024 रोजी 00.01 वाजेपासून ते 27 डिसेंबर 2024 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत बीड जिल्हयात हे आदेश लागू असणार आहेत.
धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावं अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. संतोष देशमुख यांची हत्या दुर्दैवी आहे. विरोधक हे बीडचा बिहार झालाय असं बोलत आहेत, पण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच असे गुन्हे आणि घटना घडतात. त्यामुळे बीडला बदनाम करू नये, असं देखील धनंजय मुंडेंनी म्हटलं. धनंजय मुंडेंनी कोणावरही नाव न घेता विरोधक म्हणत टोला लगावला. दुसरीकडे भाजप नेत्या व आमदार पंकजा मुंडे यांनीही अशी वेळ जिल्ह्यात पुन्हा येऊ नये अशी प्रतिक्रिया दिली.