Devendra Fadnavis : खुर्ची सलामत, तो कोट पचास; फडणवीसांच्या त्या वक्तव्याचा अर्थ काय? Special Report
## महाराष्ट्राच्या राजकारणात खुर्चीची कहाणी: एक रिपोर्ट
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांची खुर्ची हा विषय गेल्या काही दिवसांपासून या ना त्या कारणाने सतत चर्चेत येतोय. कधी खुर्च्यांची अदलाबदल झाल्याचे शिंदे यांचे वक्तव्य तर कधी मिळेल ती खुर्ची कंफर्टेबल करून घेण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची कल्पना जाहीर व्यासपीठावरून जनतेसमोर मांडली जाते. महाराष्ट्रात नव्या सरकारला १०० दिवस पूर्ण झाले असले तरी खुर्चीच्या जुन्या आठवणी आणि नवे बदल यांची चर्चा काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. पाहूया याविषयीचाच एक खास रिपोर्ट.
महाराष्ट्राच्या गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेच्या केंद्रभोवती फिरणारे हे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन, विज्ञानात यांना प्लस, मायनस आणि न्यूट्रल असे चार्ज असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र या तीन पैकी दोन नेत्यांचे चार्ज बदलले आणि एकाचा कायम राहिला. हा बदल स्वीकारणं आणि तो पचवणं हे कुणाला सोपं जातय आणि कुणाला कठीण जातय याची झलक अधून मधून जनतेला पाहायला मिळते.
दोन नंबर वरून एक नंबर वर विराजमान झालेल्या मुख्यमंत्र्यांनी कुर्चीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन नुकताच बोलून दाखवला. "सर कुरसी कंफर्टेबल आहे. त्या रोलमध्ये जातो, आमदाराचा मुख्यमंत्री झालो तर एका दिवसात मुख्यमंत्र्याच्या त्या रोलमध्ये शिरलो, मुख्यमंत्र्याचा विरोधी पक्ष नेता झालो, पहिल्या अधिवेशनापासून सरकारला झोपूच दिलं नाही. विरोधी पक्ष नेत्याचा उपमुख्यमंत्री झालो, कधीच हा विचार केला नाही की मुख्यमंत्री होतो, पूर्णपणे उपमुख्यमंत्र्याच्या रोलमध्ये गेलो, त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्र्याच्या रोलमध्ये येणं अतिशय सहज होतं."
राजकारणात खुर्ची सलामत तो कोर्ट पचास असं म्हटलं जातं. खुर्चीतला बदल स्वीकारायला तरी अनेकदा खुर्चीच्या जुन्या आठवणी मनात कसं घर करून राहतात हेही आपण अनेकदा पाहतो. "सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची बदलाबदल झाली. अजय फिक्शन. मनातन काही जात नाही ते." हेही दिवस जातील हे वाक्य प्रत्येकान चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात लक्षात ठेवावं असं सांगितलं जातं. राजकारणातले चढवतार अनुभवताना अनेकांना याच विचारांचा आधार वाटत असल्याचही दिसतय.
"ते मुख्यमंत्री झाले होते. ते उपमुख्यमंत्री झाले. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते. आता ते मुख्यमंत्री आहेत, मी उपमुख्यमंत्री आहे, म्हणजे एक नंबरचा दोन नंबर झाला, दोन नंबरचा पण एक नंबर होऊ शकतो, हे देवेंद्रजींच्या या निमित्तान कळलं, कळल तर तसं परत होऊ शकतं, शेवटी जनता जनार्दनाच्या हातात आहे ना साहेब, जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, काही प्रॉब्लेम नाही, आपण वाट बघणार आहोत, आपण कसली पेशन्स. काम करत राहणारा माणूस आहे हा."
शेवटी प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे एकाच अणूचा भाग असतात. मग तो अणू पदार्थ विज्ञानातला असो किंवा सत्तेच्या विज्ञानात. एकमेकांशी टक्कर न होता हे तीन घटक आपापला चार्ज सांभाळत राहिले तर सत्तेचा अणू डॅमेज न होता दीर्घकाळ टिकू शकतो हे देखील एक सत्यच वैज्ञानिक आणि राजकीयही.
**अमोल जोशी, सहरो रिपोर्ट, एबीपी माझा**
**एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.**
All Shows

































