PM Narendra Modi Mumbai Road Show : मुंबईत नरेंद्र मोदींचा रोड शो! रथावर कोण-कोणते नेते?
मुंबई: आमच्यावर टीका करणारे हे नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी आहे, खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी ही एनडीए सोबत असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. जे लोक आपला पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार अशा टोला मोदी यांनी पवार-ठाकरेंना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एबीपी माझा'ला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी पवार -ठाकरेंवर टीका केली.
पक्ष फुटले म्हणून लोकांना भावनिक करतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाटकोपरमध्ये रोड शो केला. भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फोडले असा आरोप केला जातोय, त्यावर नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली. नरेंद्र मोदी म्हणाले की, नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी हे आमच्या विरोधात आहेत. खरे पक्ष आमच्यासोबत आहेत. हे जर म्हणत असतील की त्यांचे पक्ष फुटले, तर मग जे त्यांचे पक्ष सांभाळू शकत नाहीत ते देश काय सांभाळणार? उद्धव ठाकरे हे शिवसेना फुटली म्हणून रडत बसतात, लोकांना भावनिक करतात. बाळासाहेबांचा मुलगा हा मर्दाचा मुलगा असायला हवा, पण त्यांच्या कुटुंबात कलह असल्याने त्यांचा पक्ष फुटला.
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/f6cfa55dd0435a54a3a5df4300d710b217378273037671000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Padma Shri Award News : अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/ffcd0aa4c85f16e87a129be5ee29f7a317378251575831000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ashok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/9648b83b76a92eb480e11e6020459bbb17378243690671000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Padma Awards 2025 : केंद्राकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातून कोणाकोणाचा सन्मान?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/835eb6d1af1a7d6787c40806390625f617378169607781000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ST Bus Ticket Hike : लालपरीचा प्रवास महागला, रत्नागिरी, अमरावतीमधील प्रवाशांच्या प्रतिक्रिया काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/16efaee2ba8c6eea5c14be338c3bd02b17378143397921000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)