एक्स्प्लोर
Advertisement
Pandharpur Maghi Yatra | माघी यात्रेवर कोरोनाचं सावट, आज रात्रीपासून दोन दिवसांसाठी देऊळ बंद
कोरोनाच्या संकटाचा फटका नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाच्या माघी यात्रेलाही बसला असून आज रात्री 10 वाजल्यापासून 24 फेब्रुवारी सकाळपर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. उद्या माघ शुद्ध दशमीच्या रात्री बारापासून एकादशीच्या रात्री बारापर्यंत पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावांत संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. या यात्रेसाठी भाविक अथवा दिंड्यानी येऊ नये म्हणून त्रिस्तरीय नाकेबंदी लावण्यात आली असून पोलिसांचा मोठा फौजफाटा शहरात दाखल झाला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी चैत्री, आषाढी आणि कार्तिकी या वारकरी संप्रदायाच्या यात्रा रद्द करण्यात आल्या होत्या. तब्बल 10 महिन्यानंतर दिवाळी पाडव्याला विठ्ठल मंदिराची दारे भाविकांना मर्यादित स्वरूपात खुली झाली होती. मात्र नवीन वर्षात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याने माघी यात्राही भाविकांसाठी रद्द करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला आहे. या यात्रेच्या काळात कोणत्याही दिंडी अथवा भाविकांना पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. उद्या रात्रीपासून 24 तासांची संचारबंदी लावण्यात आली असल्याने रस्त्यावर कोणालाही बाहेर पडत येणार नाही. यापूर्वी शहरातील जवळपास 1200 मठ आणि धर्मशाळेत आलेल्या भाविकांना यात्रा काळात निवास करण्याची परवानगी देऊ नये यासाठी पोलिसांनी सर्व मंथन नोटीस बजावल्याने आता वारकरी संप्रदाय आणि पोलीस यांच्यात संघर्ष निर्माण होऊ लागला आहे. जे भाविक यापूर्वीच शहरात आलेत त्यांना बाहेर काढू नये असा इशारा आज बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे.

महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 9 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadnavis : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस
Rohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल
Nayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडू
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement