MVA Seat Sharing : मविआचं जागावाटप जाहीर होण्याची शक्यता
MVA Seat Sharing : मविआचं जागावाटप जाहीर होण्याची शक्यता
महाराष्ट्रात 2019- 2024 या टर्ममध्ये पहिलं सरकार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्थापन केलं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. मात्र, सर्वोच्च न्यायालयातच्या आदेशानंतर व्हिडीओग्राफी करत बहुमत सिद्ध करावं लागणार होतं. मात्र, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला. हे सरकार 72 तासांच्या आत कोसळलं. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2019-2024 या टर्ममधील दुसरं सरकार होतं. या सरकारमध्ये अजित पवार नंतर उपमुख्यमंत्री बनले. ठाकरेंच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते. एकनाथ शिंदे यांचं सरकार जून 2022 मध्ये स्थापन झालं. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले, जुलै 2023 मध्ये अजित पवार देखील उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांनी 2019-2024 तीनवेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात ते एक वर्ष विरोधी पक्षनेते होते. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री बनले.