Mumbai Seat Sharing Conflict : मुंबईत कोणत्या जागांवर पेच कायम ?
Mumbai Seat Sharing Conflict : मुंबईत कोणत्या जागांवर पेच कायम ?
आगामी विधानसभा निवडणुकीचं (Vidhan Sabha Election 2024) बिगुल वाजलं असून सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच काही पक्षांनी आपल्या याद्या जाहीर केल्या आहेत. अशातच मनसेनं आपली दुसरी यादी जाहीर केली असून माहीम विधानसभा (Mahim Vidhan Sabha) मतदारसंघातून आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीममधून राज ठाकरेंचे (Raj Thackeray) सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकरांना (Sada Sarvankar) उमेदवारी देण्यात आली आहे. सदा सरवणकर म्हणजे, शिवसेनेचे प्रबळ नेते आणि ठाकरेंचे विश्वासू... पण शिवसेनेतील फुटीनंतर सरवणकर यांनी शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला. गेल्या बऱ्याच वर्षापासून माहीम मतदारसंघावर सरवणकर यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. अशातच, प्रबळ, अनुभवी अशा सरवकरांशी निवडणुकीच्या रिंगणात अमित ठाकरेंचा सामना होणार आहे.
आजवर शिवसेनेच्या तिकीटावर एकदाही सदा सरवणकर पराभूत झालेले नाहीत. शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. काही दिवसांपूर्वीच सदा सरवणकर सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरेंचे विश्वासू समजले जाणारे सदा सरवणकर सध्या शिंदे गटात आहेत. शिंदेंकडून सरवणकर यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे.