Zero Hour : आर्थिक सुधारणांचे शिल्पकार Manmohan Singh यांची कारकीर्द
Zero Hour : आर्थिक सुधारणांचे शिल्पकार Manmohan Singh यांची कारकीर्द
भारताचे माजी पंतप्रधान, जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ अन् भारताच्या अर्थक्रांतीचे शिल्पकार डॉ.मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीत निधन झाले. मनमोहन सिंग यांनी एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. फाळणीपूर्वी सध्या पाकिस्तानात असलेल्या गाहमध्ये जन्मलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनाने पाकिस्तानींना सुद्धा दु:ख झाले आहे. पाकिस्तानला झेलमच्या सुपुत्राची नेहमी आठवण राहील, असे ते म्हणतात.
इथल्या लोकांसाठी ते नेहमीच प्रेरणास्त्रोत राहतील
पाकिस्तानचे माजी मंत्री आणि पीटीआय नेते फवाद चौधरी म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन ही खरोखरच अत्यंत दुःखद बातमी आहे. ते म्हणाले की, भारत आज जे आर्थिक स्थैर्य अनुभवत आहे ते डॉ. मनमोहन सिंग यांच्या दूरदर्शी धोरणांचे परिणाम आहे. ते म्हणाले की डॉ. सिंग यांचा जन्म पाकिस्तानच्या झेलम भागातील गाह गावात झाला होता जो आता पाकिस्तानी पंजाबमधील चकवाल भागात येतो. डॉ. सिंग हे झेलमचे सुपुत्र होते आणि इथल्या लोकांसाठी ते नेहमीच प्रेरणास्त्रोत राहतील. पाकिस्तानी विश्लेषक कमर चीमा म्हणाले की, डॉ.मनमोहन सिंग यांचे भारतासाठी सर्वात मोठे योगदान म्हणजे अमेरिकेसोबतचा अणुकरार. यामुळे भारताचे आण्विक वेगळेपण संपुष्टात आले आणि त्याला अणुतंत्रज्ञानात प्रवेश मिळाला. अणुचाचण्यांनंतर लादलेले निर्बंधही संपले. तेव्हापासून भारत-अमेरिकेतील संबंध कायम नवीन उंचीवर गेले आहेत. भारत NPT चा सदस्य नाही आणि तरीही अमेरिकेने नवी दिल्लीशी नागरी अणु करारावर स्वाक्षरी केली. याचे संपूर्ण श्रेय मनमोहन सिंग यांना जाते.