Narendra Modi On Shivjayanti 2025: माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीय...; शिवजयंतीनिमित्त नरेंद्र मोदींची मराठीतून पोस्ट
Narendra Modi On Shivjayanti 2025: महाराष्ट्रासह देशभरातील विविध ठिकाणी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

Narendra Modi On Shivjayanti 2025 नवी दिल्ली: छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395वी जयंती आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध ठिकाणी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट करत शिवरायांना अभिवादन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो.
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2025
त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी… pic.twitter.com/zu0vLviiPf
नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओही केला शेअर-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. यामध्ये माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीय. छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी फक्त राजा, महाराजा, राजपुरुष नाहीय, तर माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवात आहेत आणि आराध्य दैवतांपेक्षा मोठं काहीही नाही, असं नरेंद्र मोदी व्हिडीओमध्ये बोलताना दिसताय.
अमित शाह यांनीही केलं शिवरायांना अभिवादन-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील पोस्ट करत शिवजयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. हिंदवी स्वराज्याचा" उद्घोष करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन नीती, कर्तव्य आणि धर्मपरायणता यांचा संगम होते. कट्टरपंथी आक्रमकांच्या विरुद्ध जीवनभर संघर्ष करून सनातन स्वाभिमानाचे धर्म ध्वज रक्षक छत्रपती शिवाजी महाराज एक राष्ट्रनिर्माता म्हणून सदैव स्मरणीय असतील. शिवजयंतीच्या निमित्ताने अद्वितीय साहसाचे प्रतीक, छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी नमन..., असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
‘हिंदवी स्वराज्य’ का उद्घोष करने वाले छत्रपति शिवाजी महाराज जी का जीवन नीति, कर्त्तव्य और धर्मपरायणता का संगम था। कट्टरपंथी आक्रांताओं के विरुद्ध जीवनपर्यंत संघर्ष कर सनातन स्वाभिमान के धर्म ध्वज रक्षक छत्रपति शिवाजी महाराज जी एक राष्ट्रनिर्माता के तौर पर सदैव स्मरणीय रहेंगे।… pic.twitter.com/tYS9vknrCf
— Amit Shah (@AmitShah) February 19, 2025
राहुल गांधी काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आपला आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. छत्रपती शिवजी महाराज यांनी जीवन आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहील, असं राहुल गांधी म्हणाले.
छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 19, 2025
अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज़ उठाने की प्रेरणा दी।
उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा। pic.twitter.com/1jOCYOkrC1
संबंधित बातमी:
शिवजयंतीसाठी रायगडावर हजारो शिवभक्त, VIDEO:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
