फक्त 250 रुपयांची गुंतवणूक करा, भविष्याची चिंता मिटवा, SBI म्युच्युअल फंडाची नवीन योजना सुरु
तुम्हाला पहिल्यांदा गुंतवणूक करायची असेल किंवा कमी पैशात सुरुवात करायची असेल, तर SBI म्युच्युअल फंडाने (Mutual Fund) तुमच्यासाठी एक उत्तम योजना आणली आहे. यामध्ये तुमच्या सोयीनुसार गुंतवणूक करु शकता.

SBI Mutual Fund Scheme : तुम्हाला पैशांची गुंतवणूक (Investment) करण्यासाठी विविध योजना आहेत. अनेक चांगल्या योजनांमध्ये (Scheme) पैशांची गुंतवणूक करुन तुम्ही कमी काळात जास्त नफा मिळवू शकता. तुम्हाला पहिल्यांदा गुंतवणूक करायची असेल किंवा कमी पैशात सुरुवात करायची असेल, तर SBI म्युच्युअल फंडाने (Mutual Fund) तुमच्यासाठी एक उत्तम योजना आणली आहे. जन निवेश एसआयपी योजना (Jan Nivesh SIP Yojana) असं या योजनेचं नाव आहे. खास लहान गुंतवणूकदारांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. जाणून घेऊयात या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती.
जन निवेश एसआयपी योजनेत तुम्ही फक्त 250 पासून गुंतवणूक करू शकता. अधिकाधिक लोकांना म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणे हा या योजनेचा उद्देश आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या सोयीनुसार दररोज, साप्ताहिक किंवा मासिक SIP करू शकता. त्यामुळे, कमी पैसे गुंतवून तुमचे भविष्य सुरक्षित करा. तुम्ही जननिवेश एसआयपी प्लॅनमध्ये फक्त 250 मध्ये गुंतवणूक सुरु करू शकता. हे पूर्णपणे ऑनलाइन आहे, त्यामुळे तुम्ही दररोज, आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा तुमच्या सोयीनुसार गुंतवणूक करू शकता आणि तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता.
छोट्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम संधी
SBI म्युच्युअल फंडाने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या सहकार्याने जननिवेश SIP नावाची नवीन गुंतवणूक योजना सुरु केली आहे. हे विशेषतः लहान गुंतवणूकदारांसाठी आणि प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सुरु केली आहे. शहरे आणि खेडेगावात राहणारे लोक म्युच्युअल फंडात सहज गुंतवणूक करु शकतात, हा या योजनेचा उद्देश आहे. जननिवेश एसआयपीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात गुंतवणूक करणे केवळ 250 पासून सुरू केले जाऊ शकते. म्हणजेच, जर तुम्हाला कमी पैशात गुंतवणूक करायची असेल, तर ही योजना तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकते. SEBI चेअरपर्सन माधबी पुरी बुच आणि SBI चेअरमन छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांच्या उपस्थितीत या योजनेची घोषणा करण्यात आली. अधिकाधिक लोकांना म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणे हा त्याचा उद्देश आहे. जेणेकरून ते त्यांचे पैसे वाढवू शकतील आणि भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करू शकतील.
तुमच्या सोयीनुसार आणि आर्थिक परिस्थितीनुसार गुंतवणूक करण्याची संधी
जननिवेश एसआयपी पूर्णपणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांना ते वापरणे खूप सोपे होईल. गुंतवणूकदार आता SBI च्या YONO ॲपद्वारे किंवा पेटीएम, ग्रोव आणि झेरोधा सारख्या फिनटेक प्लॅटफॉर्मद्वारे या योजनेत गुंतवणूक करु शकतात. ही योजना गुंतवणूकदारांना दररोज, साप्ताहिक (आठवड्यातून एकदा) किंवा मासिक (महिन्यातून एकदा) SIP करण्याचा पर्याय देते. म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि आर्थिक परिस्थितीनुसार गुंतवणूक करू शकता. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी उत्पन्न असलेल्या लोकांनाही गुंतवणुकीची संधी देते. जे लोक पूर्वी गुंतवणूक करण्यास घाबरत होते ते आता फक्त 250 पासून त्यांची बचत आणि गुंतवणूक सुरू करू शकतात. या SIP अंतर्गत, जर तुम्ही 5 वर्षांसाठी किमान 12 टक्के व्याज दराने दरमहा 250 रुपये गुंतवले तर 5 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 20,622 रुपये मिळतील. ही गुंतवणूक तुमचा पैसा वाढवण्याचा एक चांगला मार्ग आहे, ज्यामुळे तुम्हाला चांगला परतावा मिळेल.
दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळण्याची या योजनेत गुंतवणूक फायद्याची
जन निवेश एसआयपी ही दीर्घ मुदतीसाठी चांगली गुंतवणूक ठरु शकते. कारण म्युच्युअल फंड हा सामान्यत: चांगला परतावा पर्याय आहे. या योजनेंतर्गत तुम्ही भविष्यात लहान रक्कम जमा करून चांगला फंड तयार करू शकता. तुम्हाला एसआयपीमध्ये चक्रवाढीचा लाभ मिळतो, ज्यामुळे तुमचे पैसे हळूहळू वाढत राहतात. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला प्रथम SBI YONO, Paytm, Groww किंवा Zerodha सारख्या प्लॅटफॉर्मवर लॉग इन करावे लागेल. मग तिथून तुम्हाला जननिवेश एसआयपी निवडावी लागेल आणि ₹ 250 किंवा अधिक गुंतवणूक करावी लागेल. यानंतर तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचा SIP सहजपणे ट्रॅक करू शकता. ही योजना त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे ज्यांना थोड्या प्रमाणात गुंतवणूक सुरू करायची आहे आणि दीर्घ मुदतीत चांगला नफा मिळवायचा आहे.
महत्वाच्या बातम्या:
PM Kisan Scheme : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

