Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स, एका क्लिकवर
Maharashtra Breaking Live Updates: राज्यभरात शिवजयंतीचा मोठा उत्साह असून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.

Background
Maharashtra Breaking Live Updates: छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395 वी जयंती आहे. राज्यभरात शिवजयंतीचा मोठा उत्साह असून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. संतोष देशमुखांचा मृतदेह केजकडे न आणता कळंबच्या दिशेनं नेण्यात आला. एका महिलेशी संबंध असल्याचा बनाव करण्याचा प्लॅन होता असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर केले आहेत. राज्यातील या घडामोडींसह देशभरातील विविध बातम्यांचे अपडेट्स...
पिंपरीत आगळी-वेगळी शिवजयंती, छावा चित्रपटाचे मोफत शोचं आयोजन
पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधत छावा चित्रपटाचे मोफत शो चे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान सर्वदूर पोहचावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत शिवभक्तांनी यासाठी हजेरी लावली. अजित पवारच्या राष्ट्रवादीने याचं आयोजन केलं होतं, यानिमित्ताने छावा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी करण्यात आली.
किल्ले रायगडावर विकी कौशल यांनी घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन
रायगड: छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत असणारे छावा सिनेमाचे अभिनेते विकी कौशल यांनी आज शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले रायगडवर उपस्थिती लावली.यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज सदरेवरील पुतळ्याच दर्शन घेऊन राजांना मुजरा अर्पण केला. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा ची टीम सुधा उपस्थित होती. विकी कौशल ला पाहण्यासाठी हजारोंच्या संखेने शिवभक्त आणि छावा सिनेमाचे फॅन मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांच्या मानवंदनेत किल्ले रायगडावर यावेळी सलामी देण्यात आली.























