Chhaava Box Office Collection Day 5: अंगार है 'छावा'! चोहीकडे गजर फक्त छत्रपती 'शंभू राजां'चाच; पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तांडव, कमाई किती?
Chhaava Box Office Collection Day 5: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' सध्या राज्यासह देशभरात धुमाकूळ घालतोय. 'छावा'नं फक्त आणि फक्त चारच दिवसांत आपलं भांडवल वसूल केलं.

Chhaava Box Office Collection Day 5: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) थिएटरमध्ये हिट झाला असून सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) गाजत आहे. कमाईच्या बाबतीत तर, 'छावा'नं अनेक दिग्गजांना गुडघे टेकायला भाग पाडलं आहे. 'छावा'नं फक्त आणि फक्त चारच दिवसांत आपलं भांडवल वसूल केलं. अशातच जाणून घेऊयात 'छावा'नं रिलीजनंतर पाचव्या दिवशी किती कमाई केली? याबाबत सविस्तर...
'छावा'नं पाचव्या दिवशी किती कमाई केली?
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याच्या गाथेवर आधारित 'छावा' चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होताच, सुसाट असल्याचं पाहायला मिळालं. 2025 मधील सर्वात मोठ्या ओपनरचा मान 'छावा'नं पटकावला. चित्रपटानं सोमवारी मोठी कमाई केल्यानंतर, केवळ 130 कोटी रुपयांचं बजेट वसूल केलेलं नाही तर 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त नफाही मिळवला आहे. अशातच मंगळवारीही 'छावा'नं जबरदस्त कलेक्शन केलं आहे.
- सॅकनिल्कच्या अहवालानुसार, 'छावा'नं पहिल्या दिवशी 31 कोटींची कमाई केली आहे.
- दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 37 कोटी रुपये कमावले आहेत.
- तिसऱ्या दिवशी 'छावा' चित्रपटाचं कलेक्शन 48.5 कोटी रुपये होते.
- 'छावा'नं चौथ्या दिवशी 24 कोटी रुपये कमावले.
- आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच, पहिल्या मंगळवारी झालेल्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
- सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'नं रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजे, पहिल्या मंगळवारी 24.50 कोटींची कमाई केली आहे.
- यासह, 'छावा'ची पाच दिवसांत एकूण कमाई आता 165 कोटी रुपये झाली आहे.
View this post on Instagram
'छावा'ची पाचव्या दिवशी 'शैतान'ला मात
'छावा' रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच एकापाठोपाठ एक रेकॉर्ड मोडत आहे. अशातच रिलीजच्या पाचव्या दिवशी या फिल्मनं अजय देवगणची शैतान लाईफटाईम कलेक्शनच्या रेकॉर्ड्सना मात दिली आहे. दरम्यान, बॉलिवूड हंगामाच्या आकड्यांनुसार, शैतानचं भारतात लाईफटाईम कलेक्शन 149.49 कोटी रुपये होतं. अशातच 'छावा'नं पाच दिवसांत 165 कोटींची कमाई केली आहे.
'छावा' 200 कोटींपासून काही अंतर दूर
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' बॉक्स ऑफिसवर बुलेट ट्रेनपेक्षाही वेगानं कमाई करत आहे. या चित्रपटानं प्रदर्शित झाल्यानंतर पाच दिवसांत 160 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. आता हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा ओलांडण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहे. 'छावा' दुसऱ्या आठवड्याच्या आधी हा टप्पा ओलांडेल. यासह, 'छावा'नं विक्की कौशलच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'उरी द सर्जिकल स्ट्राइक'च्या आयुष्यभराच्या कलेक्शनच्या (245.36 कोटी) अगदी जवळ पोहोचला आहे. सध्या सर्वांच्या नजरा बॉक्स ऑफिसवर आहेत. 'छावा' येत्या दिवसांत कोणकोणते रेकॉर्ड्स मोडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























