Anil Deshmukh Bail : अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा, CBIची याचिका कोर्टाने फेटाळली
Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) हायकोर्टाचा (High Court) मोठा दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुखांच्या जामीनाच्या (Anil Deshmukh Bail) स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती आज संपणार आहे. याचसंदर्भात सीबीआयनं जामीनाला मुदतवाढ मिळण्यासाठी केलेल्या याचिकेसंदर्भात आज हायकोर्टात तातडीची सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत अनिल देशमुखांच्या जामिनावरची स्थगिती वाढवा, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती. मात्र जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. त्यामुळे उद्याच अनिल देशमुखांची सुटका होणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली आहे.
सीबीआयला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पण, सीबीआयच्या मागणीनंतर देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती (Stay on Bail Order) देण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयनं न्यायालयाला विनंती करत देशमुखांच्या जामीन अर्जाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. न्यायालयानं सीबीआयच्या विनंतीनंतर देशमुखांच्या जामिनाला स्थगिती दिली होती. त्यामुळे जामीन मिळूनही अनिल देशमुखांना तुरुंगातच राहावं लागलं होतं. अखेर आज हायकोर्टानं जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी फेटाळली आणि अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.