(Source: Poll of Polls)
Manorama Khedkar Arrested : मनोरमाबाई तोऱ्यात, बंदुक भोवली, पोलीस कोठडी सुनावली Special Report
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे कारनामे जसे उघड होत गेले, तसेच त्यांच्या मातोश्री मनोर खेडकर यांच्या दादागिरीचेही किस्से अगदी व्हिडीओसकट समोर आले... हातात पिस्तुल घेऊन कधी शेतकऱ्यांना केलेली दमदाटी असो, की पोलिसांना गेटवर ताटकळत ठेवून केलेली अरेरावी असो... अशाच मनगटशाहीमुळे त्यांना आता जेलची वारी घडलीय... पाहूयात... याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...
Manorama Khedkar Arrest: ट्रेनी आयएएस पूजा खेडकरची (IAS Pooja Khedkar) आई मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) आज सकाळी पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलं. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस तिला पुण्याला घेऊन आले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करून तिची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) कोर्टात हजर केलं होतं. पोलिसांनी कोर्टात मनोरमा खेडकरला 7 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केलेली आहे. मात्र, कोर्टाने मनोरमा खेडकरला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे
मनोरमा खेडकरचे (Manorama Khedkar) काही दिवसांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील तिने हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन आले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करून तिची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर कोर्टात पोलिसांनी मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) 7 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केलेली होती. मात्र, कोर्टाने मनोरमा खेडकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.