Gadchiroli School:राज्यातील गोंडी भाषेत शिक्षण देणाऱ्या एकमेव शाळेची अस्तित्वाची लढाई Special Report
गोंडी भाषेत शिक्षण देणाऱ्या राज्यातील एकमेव शाळेची सध्या अस्तित्वासाठी लढाई सुरू आहे. ग्रामसभेकडून चालवण्यात येत असलेली ही शाळा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अनाधिकृत ठरवली. तशी नोटीसही बजावल्यानं ग्रामसभेनं न्यायालयात धाव घेतली आहे. पाहूयात काय आहे हे सगळं प्रकरण...
गोंडी शाळा टिकवण्यासाठी संघर्ष?
- गोंडी ही दक्षिण-मध्य द्रविड भाषा
- मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश मधील बोलीभाषा
- सुमारे 30 लाख लोक गोंडी भाषा बोलतात
- 2019 पासून गोंडी शाळा राज्यात सुरू
- पहिली ते पाचवी अशा ५ इयत्तांची शाळा
- गोंडी, मराठी, इंग्रजीचं शिक्षण
- मोहगाव ग्रामसभेत ठराव करून गेल्या 6 वर्षांपासून शाळा सुरू
शासनाची नियमावली आणि गोंडी भाषेत शिक्षण देणारी ही शाळा यांच्यात सध्या संघर्ष वाढलाय... या मुलांना वयानुसार इतर शाळांमध्ये दाखल होणं शक्य असल्याचं शिक्षण विभागाचं म्हणणं आहे.
मुलं आपल्या मातृभाषेतून सर्वंकष शिकू शकतात असं अनेक शिक्षणतज्ज्ञांचं मत आहेच.
त्यामुळे मराठीसोबतच जर गोंडी भाषेतूनही इथे ध़डे दिले जात असतील तर ही शाळा कशी जगवता येईल यासाठी शासनानं आणि शाळा प्रशासनानं एकत्र प्रयत्न केले तर इथली मुलं निश्चितच गोंडी भाषा केवळ राज्यात नाही तर जगाच्या नकाशावर पोहोचवू शकतील...
आणि आपली भाषाही आपल्या शाळेप्रमाणे जिवंत ठेवू शकतील...
All Shows


































