Bhandara Axis Bank Manager Fraud : बँक मॅनेजरनेच लुटली बँक, ठेवीदारांना गंडा Special Report
१ लाखाच्या बदल्यात २ लाख रुपये देतो असं तुम्हाला कुणी म्हटलं तर ? काहींच्या मनात संशयाची पाल चुकचुकेल.. पण पैशांची हाव करणारे लगेच हा व्यवहार करायला तयार होतील नाही का?.. भंडाऱ्यातही असंच घडलंय. पाच कोटींच्या बदल्यात सात कोटी देतो अशी बतावणी एका टोळीने बँक मॅनेजरला केली. बँक मॅनेजरलाही हे खरं वाटलं म्हणून त्याने या व्यवहाराला होकार दिला.. पण आता प्रश्न हा आहे की बँक मॅनेजरकडे पाच कोटी आले कुठून? चला तर मग पाहूया या रिपोर्टमधून..
५ कोटींच्या बदल्यात ७ कोटी रुपये देण्याचं प्रलोभन देत उत्तराखंड, छत्तीसगड आणि गोंदियाच्या टोळीनं भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील ॲक्सिस बँकेच्या मॅनेजरलाचं झाश्यात ओढलं. आणि पैशाच्या आमिषान ॲक्सिस बँकेचे मॅनेजर यांनी त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं बँकेतून पाच कोटी रुपये काढले. मात्र, पुढील अनर्थ होण्याच्यापूर्वीचं भंडारा पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींच्या मुस्क्या आवळत बँकेतून काढलेली पाच कोटींची रक्कम ताब्यात घेतली. काल या कारवाईत भंडारा पोलिसांनी ९ आरोपींना ताब्यात घेतलं होतं. आज पुन्हा एका आरोपीला ताब्यात घेतलं असून आरोपींची संख्या आता दहावर पोहोचली आहे.
तुमसर येथील ॲक्सिस बँकेत गौरीशंकर बावनकुळे हे बँक मॅनेजर असून मागील सात महिन्यापासून या स्कॅम करणाऱ्या टोळीनं त्यांना दुप्पट रकमेचा आमिष दिलं. तत्पूर्वी या टोळीनं तुमसरच्या एका धनाड्य व्यावसायिकाला अशा प्रकारचं आमिष देऊन फसविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला या टोळीवर संशय आल्यानं तो यातून सुटला अशी माहिती आता समोर येत आहे. ॲक्सिस बँकेची मॅनेजर गौशंकर बावनकुळे यांनी काढलेली ही रक्कम तुमसर च्या इंदिरानगर येथील राजकुमार ड्रायक्लीनर्स इथे ठेवली होती. या संपूर्ण प्रकरणात भंडारा पोलिसांनी काल नऊ जणांना ताब्यात घेतलं जात ॲक्सिस बँकेचा मॅनेजर कविशंकर बावनकुळे आणि बँक कर्मचारी विशाल ठाकरे याच्यासह टोळीच्या सात जणांना ताब्यात घेतलं होतं. आज सकाळी आणखी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला असून आरोपींची संख्या आता दहावर पोहोचली आहे.
All Shows

































