PM Modi Prayagraj Amrutsnan : इलेक्शन आणि देवदर्शन; मोदींचं प्रयागराजमध्ये अमृतस्नान Special Report
स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत... प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात आतापर्यंत लाखो साधू संत आणि कोट्यवधी भारतीयांनी पवित्र स्नान केलंय. याचदरम्यान पंतप्रधान मोदीची अमृतस्नानासाठी प्रयागराजमध्ये पोहोचले. यावेळी मोदींनी अमृतस्नानानंतर गंगापूजनही केली. मात्र प्रयागराजमधल्या स्नानासाठी मोदींनी ज्या मुहूर्ताची निवड केली त्याची सध्या चर्चा होतेय. कारण दिल्लीतील निवडणुकीदिवशीच मोदी प्रयागराजमध्ये पोहोचले... पाहूयात याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट
पंतप्रधान मोदींनी
प्रयागराजमध्ये सुरु असलेल्य़ा कुंभमेळ्यात
अमृतस्नान केलं तीच ही दृश्य...
अमृतस्नानानंतर मोदींनी गंगापूजनही केलं...
पण मोदींनी या सगळ्यासाठी मुहूर्त साधला
तो दिल्ली विधानसभा निवडणुकीचा...
त्यामुळे चर्चा सुरु झाली ती निवडणुका आणि पंतप्रधान मोदींच्या देवदर्शनाची....
याआधी अनेकदा निवडणुकाच्या दरम्यान
पंतप्रधान मोदी देवदर्शनाला गेल्याचं
किंवा ते ध्यानधारणेला बसल्याचं पाहायला मिळाली होतं...
२०१८ साली कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान
पंतप्रधान मोदी नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरात दर्शनाला पोहोचले होते...
पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान
थेट केदारनाथला पोहोचले....
मोदींनी याठिकाणी एका गुहेत तब्बल १७ तास ध्यानधारणा केली होती...
२०२४ साली पंतप्रधान मोदी
लोकसभा निवडणुकीदरम्यान कन्याकुमारीतील
स्वामी विवेकानंद स्मारकाच्या ठिकाणी ध्यान केलं...
याठिकाणी तब्बल ४५ तास मोदींनी साधना केली होती...
आता पुन्हा एकदा दिल्ली निवडणुका
आणि मोदींचं प्रयागराजमधलं महास्नान
हा योग जुळून आला...
निवडणुकांच्या काळात पंतप्रधानांचं देवदर्शन करणं
हा भाजपच्या रणनीतीचाच एक भाग आहे का?
अशी चर्चा सध्या रंगताना दिसतेय...
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा
All Shows

































