Indian Engineer At Iran : इराणच्या जेलमध्ये अडकला नांदेडचा तरुण; 2 महिन्यांनी घरवापसी Special Report
महाराष्ट्रातला एक तरुण व्यवसायाच्या निमित्तानं इराणला गेला. पण इराणच्या तेहरान शहरात फिरताना फोटो काढल्यामुळे तो कारवाईच्या कचाट्यात सापडला. तब्बल दोन महिने या तरुणाला इराणच्या तपास यंत्रणांच्या चौकशीला सामोरं जावं लागलं. मात्र दोन महिन्यांनी हा तरुण घरी परतलाय. नेमकं काय घडलं या तरुणासोबत, जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून
एक फोटो क्लिक आणि थेट जेलमध्ये
इराणच्या जेलमध्ये अडकला नांदेडचा तरुण
अखेर दोन महिन्यांनी योगेश सुखरुप परत
नांदेडच्या वसमतचा योगेश पांचाळ...
दोन महिन्यांपूर्वी पेशानं इंजिनियर असलेल्या योगेशनं
व्यवसायाच्या नव्या संधी शोधण्यासाठी
इराणची राजधानी तेहरान गाठली
पण इराणमध्ये योगेशच्या बाबतीत काहीतरी वेगळंच घडलं...
व्यवसायाच्या निमित्तानं इराणला पोहोचलेले योगेश पांचाळ
या सगळ्या घटनेनंतर हॉटेल रुममधून थेट डिटेन्शन सेंटरमध्ये गेले
आणि घरच्यांशी असलेला संपर्क बंद झाला...
श्रद्धा यांनी राज्यसभा खासदार अजित गोपछडे
यांच्या कानावर ही गोष्ट घातली
त्यानंतर योगेशचा शोध सुरू झाला...
सुरुवातीला इराणच्या भारतीय दूतावासानं दाद दिली नाही
पण अखेर योगेश जेलमध्ये असल्याची माहिती इराणकडून देण्यात आली....
तिकडे इराणमध्ये योगेश यांची चौकशी सुरु होती...
शेवटी ५५ दिवसांनी इराणमधून पांचाळ कुटुंबाला
योगेश यांचा सुखरुप असल्याचा फोन आला
आणि चार दिवसात ते घरीही पोहोचले...
गेले दोन महिने योगेश पांचाळ
आणि त्यांच्या कुटुंबानं जे सोसलं
याचा विचारही त्यांनी कधी केला नसेल
मात्र योगेश यांच्या सुखरुप येण्यानं या कुटुंबात पुन्हा आनंदाचं वातावरण आहे...
दिल्लीहून सोमेश कोलगेसह नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पुणे
All Shows

































