एक्स्प्लोर

India at Tokyo 2020: टोकियो ऑलिम्पिकचा समारोप, भारताने 7 पदके जिंकली, आता 2024 मध्ये पॅरिसमध्ये भव्य स्पर्धा होणार

India at Tokyo 2020: 23 जुलै 2021 रोजी सुरु झालेल्या टोकियो ऑलिम्पिकचा 16 दिवसांनंतर रविवारी समारोप झाला आहे. या ऑलिम्पिकमध्ये जगातील 205 देशांतील हजारो खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवली.

India at Tokyo 2020: टोकियो ऑलिम्पिकचा 16 दिवसानंतर रविवारी समारोप सोहळा पार पडला. यावेळी 205 देशांतील हजारो खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आणि पदके जिंकण्याचा प्रयत्न केला. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदकांसह ऐतिहासिक कामगिरी केली आङे. भारताच्या खात्यात एक सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदके आली. आता पुढील ऑलिम्पिक 2024 मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होणार आहे.

टोकियोमध्ये भारताची कामगिरी अशी होती
भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या रौप्य पदकासह शानदार सुरुवात केली. यानंतर भारताला अनेक कांस्य पदके आणि दोन रौप्य पदक मिळाली. भालाफेकपटू नीरज चोप्राच्या सुवर्णपदकासह देशाची ऑलिम्पिक मोहीम संपली. यावेळी भारताला ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेत पहिले पदक मिळाले, जे 13 वर्षांनंतर पहिले सुवर्णपदकही होते. याशिवाय हॉकीमध्ये 41 वर्षांपासून सुरू असलेल्या पदकाची प्रतीक्षाही संपली आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारतालाही सर्वाधिक 7 पदके मिळाली.

या खेळांमध्ये भारताला पदके मिळाली
भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला सुवर्णपदक दिलं. वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि पैलवान रवी दहिया यांनी देशाच्या खात्यात रौप्य पदकांची भर घातली. त्यांच्याशिवाय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, बॉक्सर लवलिना बोर्गोहेन आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी आपापल्या खेळात कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकांची संख्या वाढवली. विशेष गोष्ट म्हणजे भारतीय पुरुष हॉकी संघाने चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. एकूण 7 पदकांसह भारताने पदकतालिकेत 48 वे स्थान मिळवले.

टोकियो ऑलिम्पिकमधील टॉप 10 देश
या वेळी अमेरिका ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके जिंकून पहिल्या क्रमांकावर राहिली. अमेरिकेने 39 सुवर्ण, 41 रौप्य आणि 33 कांस्यपदके जिंकली. अमेरिकेने एकूण 113 पदके जिंकली. चीन दुसऱ्या क्रमांकावर होता. चीनने 38 सुवर्ण, 32 रौप्य, 18 कांस्य अशी एकूण 88 पदके जिंकली. जपान तिसऱ्या क्रमांकावर होता, त्यांनी 27 सुवर्ण, 14 रौप्य, 17 कांस्य अशी एकूण 58 पदके जिंकली. ब्रिटन चौथ्या क्रमांकावर होता, ज्याने 22 सुवर्ण, 21 रौप्य आणि 22 कांस्य अशी एकूण 65 पदके जिंकली. रशिया पाचव्या क्रमांकावर होता, ज्याने 20 सुवर्ण, 28 रौप्य, 23 कांस्य अशी एकूण 71 पदके जिंकली.

17 सुवर्ण, 7 रौप्य, 22 कांस्य अशी एकूण 46 पदकांसह ऑस्ट्रेलियाने सहावे स्थान मिळवले. सातव्या क्रमांकावर नेदरलँड होते, ज्याने 10 सुवर्ण, 12 रौप्य, 14 कांस्य अशी एकूण 36 पदके जिंकली. फ्रान्स आठव्या क्रमांकावर होता. फ्रान्सने 10 सुवर्ण, 12 रौप्य, 11 कांस्य अशी एकूण 33 पदके जिंकली. जर्मनी 10 गुणांसह 9 व्या स्थानावर राहिला, त्याच्या खात्यात 10 सुवर्ण, 11 रौप्य, 16 कांस्य आणि 37 पदके आहेत. इटली दहाव्या क्रमांकावर होता. इटलीने 10 सुवर्ण, 10 रौप्य आणि 20 कांस्यपदके जिंकली.

पुढील ऑलिम्पिक पॅरिसमध्ये होणार
पुढील ऑलिम्पिक 2024 मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होणार आहे. हे XXXIII ऑलिम्पियाड असेल. हा खेळ पॅरिसमध्ये 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 दरम्यान आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या आधी कोरोना महामारी हा सर्वात मोठा अडथळा बनत होता, अगदी त्याचा कार्यक्रम 2020 पासून पुढे ढकलण्यात आला आणि 2021 मध्ये हलवण्यात आला. कोरोनामुळे, या ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांनी स्वतःच पदके घातली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 19 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्सRSS On Aurangzeb :औरंगजेबचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, संघाने कान टोचले: Majha Special DiscussionNagpur Aurangzeb Solgan Video : हिंसेपूर्वी जमावाकडून काही धार्मिक घोषणाबाजीही झाल्याची माहितीABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 19 March 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
Hardik Pandya : 'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
Embed widget