एक्स्प्लोर
Neeraj Chopra : 1 सेंटीमीटरमुळं नीरज चोप्राचं सुमारे 15 लाखांचं नुकसान, डायमंड लीगमध्ये नेमकं काय घडलं?
Neeraj Chopra Diamond League 2024 : यावेळी नीरज चोप्राला डायमंड लीगमध्ये सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले. कारण भालाफेक स्पर्धेत तो दुसरा राहिला.
Diamond League Neeraj Chopra
1/6

नीरज चोप्रा ब्रुसेल्स डायमंड लीग फायनल्स 2024 मध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला. नीरज हा भालाफेकचा बादशहा आहे. मात्र यावेळी ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने त्याचा पराभव केला. त्यामुळे डायमंड लीगमध्ये नीरजचे जवळपास 15 लाखांचे नुकसान झाले.
2/6

खरंतर, नीरज चोप्रा फक्त 1 सेंटीमीटरने चुकला. यामुळे तो दुसऱ्या स्थानावर राहिला. नीरजला 12000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 10 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत.
3/6

पीटर्स पहिल्या क्रमांकावर राहिला आणि विजेतेपद पटकावले. यासाठी पीटर्सला 30000 डॉलर्स म्हणजे सुमारे 25.16 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत.
4/6

जर नीरज चॅम्पियन झाला असता तर त्याला बक्षीस म्हणून 25.16 लाख रुपये मिळाले असते. पण असे झाले नाही त्यामुळे त्यांचे नुकसान झाले.
5/6

नीरज हा डायमंड लीगचा चॅम्पियन राहिला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्येही त्याने रौप्यपदक जिंकले होते.
6/6

पॅरिस ऑलिम्पिकनंतर नीरजने तयारी सुरू केली होती. पण डायमंड लीगमध्ये तो पहिला आला नाही.
Published at : 15 Sep 2024 01:38 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























