वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
मुस्तकीम हौलादारने 4 तास 20 मिनिटे फलंदाजी केली. त्याने 170 चेंडूत 404 धावांची ही खेळी खेळली, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 237 पेक्षा जास्त होता.

770 runs 50 fours and 22 sixes in the ODI match : कँब्रियन स्कूल अँड कॉलेजकडून खेळणाऱ्या मुस्तकीम हावलादरने इतिहास रचला. एकदिवसीय सामन्यात 404 धावा करत त्याने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. त्याने नाबाद 404 धावा करताना 50 चौकार आणि 22 षटकार ठोकले. मुस्तकीमने केवळ चौकार आणि षटकारांसह 332 धावा केल्या हा देखील अचाट पराक्रम आहे. बांगलादेशातील मान्यताप्राप्त क्रिकेटमध्ये 400 हून अधिक धावा करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
मुस्तकीम हौलादार हा नववीत शिकतो
शालेय क्रिकेटमधील हा जिल्हास्तरीय सामना होता, जो अधिकृत क्रिकेट म्हणून वर्गीकृत नाही. मुस्तकीम हा 9व्या वर्गाचा विद्यार्थी आहे, त्याने ढाका विद्यापीठ क्रिकेट मैदानावर खेळलेल्या या खेळीने केवळ बांगलादेश क्रिकेटच नाही तर जागतिक क्रिकेटलाही हादरवून सोडले. 50 षटकांच्या या सामन्यात मुस्तकीम सुरुवातीपासून डावाच्या शेवटपर्यंत क्रीजवर होता.
699 धावांची विक्रमी भागीदारी
मुस्तकीम हौलादारने 4 तास 20 मिनिटे फलंदाजी केली. त्याने 170 चेंडूत 404 धावांची ही खेळी खेळली, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 237 पेक्षा जास्त होता. जिथे एकदिवसीय सामन्यांमध्ये 350 धावा केल्यानंतर संघ आनंदी होऊ लागतात, तिथे मुस्तकीमने ही ऐतिहासिक खेळी खेळून क्रिकेट जगतासाठी नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. कर्णधार सोद परवेझसोबत 699 धावांची भागीदारी केली. कर्णधार परवेझ स्वतः 124 चेंडूत 256 धावा करून नाबाद परतला. 206 च्या तुफानी स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना त्यांनी 32 चौकार आणि 13 षटकार ठोकले, ही त्यांच्या दोघांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या आहे. या दोन फलंदाजांच्या बळावर कँब्रियन स्कूल अँड कॉलेजने 770 धावांची मोठी धावसंख्या उभारली.
738 धावांनी सामना जिंकला
एकीकडे कँब्रियन स्कूल अँड कॉलेजची उत्कृष्ट फलंदाजी होती, तर दुसरीकडे गोलंदाजीतही या संघाने धुमाकूळ घातला. समोर सेंट ग्रेगरी संघ 11.2 षटकात अवघ्या 32 धावांत सर्वबाद झाला. अशाप्रकारे केंब्रियन स्कूल अँड कॉलेजने 738 धावांनी विक्रमी विजय संपादन केला.
इतर महत्वाच्या बातम्या























