रोहित-विराटच नव्हे तर ऋषभ पंतच्या फॉर्मनेही भारताची चिंता वाढवली
Virat, Rohit ,Pant IPL Form : आयपीएलच्या 15 व्या हंगामात हार्दिक पांड्या, राहुल गाजवत असताना रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
Virat, Rohit, Pant IPL Form : आयपीएलच्या 15 व्या हंगामात हार्दिक पांड्या, राहुल गाजवत असताना रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यांचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा बनला आहे. पुढील काही दिवसांत ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 वर्ल्डकप होणार आहे. त्याआधी भारताच्या या स्टार खेळाडूंनी चिंता वाढवली आहे.
विराट तीन वेळा गोल्डन डक -
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली आयपीएलमध्ये तीन वेळा गोल्डन डकचा शिकार झालाय. 12 सामन्यात 19.63 च्या सरासरीने विराट कोहलीला फक्त 216 धावाच चोपता आल्या. यादरम्यान विराट कोहलीला फक्त एक अर्धशतक झळकावता आलेय. यंदाच्या हंगामात विराट कोहलीने 20 चौकार आणि एक षटकार लगावलाय. विराट कोहली आयपीएलमध्ये तीन वेळा गोल्डन डकचा शिकार झालाय. यावरुनच त्याच्या खराब फॉर्मचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
रोहित शर्माची जादू गायब
यंदाच्या हंगामात मुंबईच्या कर्णधार रोहितलाही चमकदार कागिरी करता आली नाही. विराट कोहलीप्रमाणेच रोहितचा फॉर्मही गायब आहे. रोहित शर्माला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. रोहित शर्माने दहा सामन्यात 19.80 च्या सरासरीने 198 धावा चोपल्या आहेत. रोहित शर्माला यंदाच्या हंगामात अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. रोहित शर्मा किती बॅडपॅचमध्ये आहे, याचा अंदाज तुम्ही यावरु बांधू शकता...
सेट झाल्यानंतर बाद होतोय पंत -
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या तुलनेत यंदा अधिक धावा केल्या आहेत. पण ऋषभ पंत सेट झाल्यानंतर मोक्याच्या क्षणी विकेट टाकत आहे. दिल्लीच्या संघाला याचा सर्वाधिक फटका बसलाय. पंतला अद्याप एकही मोठी खेळी करता आलेली नाही. पंतच्या बॅटमधून अर्धशतकही निघाले नाही. आतापर्यंत पंतने 11 सामन्यात 281 धावा केल्या आहेत.
टी20 वर्ल्डकप जवळ येतोय -
ऑस्ट्रेलियात होणारा टी 20 वर्ल्डकप जवळ येतोय... ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात टी 20 वर्ल्डकप होणार आहे. वर्ल्डकप आधी भारतीय खेळाडू फॉर्मध्ये येणे गरजेचं आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत भारतीय संघाचे महत्वाचे खेळाडू आहे. तिन्ही खेळाडूंचे फॉर्ममध्ये नसणे, भारतासाठी चिंतेचा विषय आहे.