Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडली असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यात महायुती (Mahayuti) की महाविकास आघाडी? (mahavikas Aghadi) कोण सत्ता स्थापन करणार? याकडे अवघ्या राज्यभराचे लक्ष लागले आहे. तर विधानसभेच्या निकालापूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच आता भाजपने (BJP) अपक्ष आणि बंडखोरांना गळाला लावण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. भाजपकडून सहा नेत्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. शनिवारी सकाळी 8 वाजता राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांना गळाला लावण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडी आणि महायुती समोर आहे.