Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Jitendra Awhad : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार, 160 पेक्षा जास्त जागा येणार आहेत. बारामतीत युगेंद्र पवार येणार, एक मताने का होईना पण युगेंद्र आमदार होणार असल्याचा दावाही आव्हाड यांनी केला.
Jitendra Awhad on Ajit Pawar : मला जे काम करायला शरद पवार सांगतील ते मी करणार, मी काही मागितले नाही, मी कधी मागणार देखील नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. आव्हाड यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या दाव्यावरून टोला लगावला आहे.
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो
अजित पवार यांच्या गुलाबी रंगावरून आव्हाड यांनी खोचक शब्द टोला लगावला आहे. आव्हाड म्हणाले की, गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही, अशा शब्दात त्यांनी टोला लगावला.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार
आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार, 160 पेक्षा जास्त जागा येणार आहेत. बारामतीत युगेंद्र पवार येणार, एक मताने का होईना पण युगेंद्र आमदार होणार असल्याचा दावाही आव्हाड यांनी केला. दरम्यान, अपक्षांना भाजपकडून मोठी ऑफर दिली जात असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, भाजपकडे प्रचंड पैसा आहे, निवडणुकीत त्यांनी कोटींच्या कोटी वाटले, त्यामुळे आताही ते पैसे वाटणार, अपक्ष आमदारांना पैसे देणार, भाजपला अजून काय येतं? असा टोला त्यांनी लगावला.
तुम्ही किती पक्ष बदलले ते बघा
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, नारायण राणे यांना सल्ला आहे, तुम्ही किती पक्ष बदलले ते बघा, तीन पक्ष बदलेल्या माणसाने शरद पवारांना सांगू नये, तुम्ही तुमचं बघा, असा टोलाही त्यांनी लगावला.
काय म्हणाले नारायण राणे?
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार आपला ट्रॅक बदलू शकतात. ते कोणत्याही बाजूला जाऊ शकतात. शरद पवार हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेससोबत राहणार नाहीत. शरद पवार महायुतीसोबत हातमिळवणी करु शकतात. त्यामुळे राज्यात कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार नाही आणि उद्धव ठाकरे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले. नारायण राणे यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. शरद पवार यांनी खरोखरच महायुतीसोबत हातमिळवणी केल्यास ती महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्णपणे कलाटणी देणारी घटना ठरेल. त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या