VIDEO : चेन्नई स्पर्धेबाहेर जाताच डोळ्यात अश्रू, अंबाती रायडूचे डोळे पाणावले, रिअॅक्शन व्हायरल
Ambati Rayudu : प्लेऑफसाठी आरसीबी आणि चेन्नई यांच्यामध्ये शनिवारी बंगळुरुमध्ये आमनासामना झाला. आरसीबीने चेन्नईचा 27 धावांनी पराभव करत प्लेऑफमधील स्थान निश्चित केलेय.
RCB vs CSK, Reaction of Ambati Rayudu : प्लेऑफसाठी आरसीबी आणि चेन्नई यांच्यामध्ये शनिवारी बंगळुरुमध्ये आमनासामना झाला. आरसीबीने चेन्नईचा 27 धावांनी पराभव करत प्लेऑफमधील स्थान निश्चित केलेय. चेन्नईला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अखेरच्या षटकात 17 धावांची गरज होती. धोनीने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत शानदार सुरुवात केली. पण त्यानंतर यश दयान यानं शानदार कमबॅक करत धारधार गोलंदाजी केली. यश दयाल याने अखेरच्या पाच चेंडूवर फक्त एक धाव दिली अन् धोनीलाही बाद केले. चेन्नईचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर अनेक सीएसके चाहत्यांना धक्का बसला. चेन्नईचा माजी खेळाडू अंबाती रायडू यालाही धक्का बसला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चेन्नईचा माजी खेळाडू अंबाती रायडू सध्या समालोचन करत आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर तो समालोचन करत आहे. चेन्नई आणि आरसीबीच्या सामन्यावेळी तो स्टुडिओमध्येच होता. रायडूचा चेन्नईला पाठिंबा होता. चेन्नईचं आव्हान संपल्यानंतर रायडू याला विश्वास बसला नाही. त्याला धक्का बसला. त्याच्या डोळ्यात अश्रूही तरळले होते. पण त्यानं स्वत:वर नियंत्रण मिळवले. पण रायडूच्या डोळ्यातील दु:ख मात्र स्पष्ट दिसत होते. रायडूचा हा 10 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. रायडूच्या या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
पाहा व्हिडीओ -
Reaction of Ambati Rayudu after CSK were knocked out. pic.twitter.com/QUczM0uqQg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 19, 2024
आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात रायडूचा पाठिंबा धोनी ब्रिगेडला होता. संपूर्ण सामन्यावेळी तो चेन्नईच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. चेन्नई प्लेऑफमध्ये पोहचेल, असा विश्वास त्याला होता. चेन्नई गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहचेल, असा विश्वास रायडूने व्यक्त केला होता. पण प्रत्यक्षात मात्र आरसीबीच्या संघाने आपला खेळ उंचावला अन् चेन्नईचा 27 धावांनी पराभव केला. चेन्नईचं आव्हान संपल्यानंतर रायडूची रिअॅक्शन चर्चेत आहे. रायडूचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायल झालाय.
In the whole build-up of the match, ambati rayudu was just talking like rcb cannot win this anyhow, he even said csk is looking for top 2 position, this match is an easy win for them. Now I love his tears man..... pic.twitter.com/CQQAnWyliA
— प्रियंवदा 🇮🇳🚩 (@Priyamvada227s) May 19, 2024
चेन्नईचं आव्हान संपुष्टात, सामन्याचा लेखाजोखा -
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 218 धावांचा डोंगर उभारला. आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस यानं अर्धशतक ठोकले. विराट कोहली 47, रजत पाटीदार 41, कॅमरुन ग्रीन 38 यांनी महत्वाच्या खेळी केल्या. त्याशिवाय दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अखेरच्या क्षणी चौकार आणि षटकारांचा पाऊश पाडला. मॅक्सवेलने 16 तर कार्तिकने 14 धावा वसूल केल्या. 2019 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. कर्णधार ऋतुराज स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर मिशेलही 4 धावांवर बाद झाला. रचीन रवींद्र याने एकट्याने लढा दिला. त्याने 61 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला ठरवीक अंतराने विकेट पडल्या. शिवम दुबे, सँटनर बाद झाले. अखेरीस जाडेजा आणि धोनीने फटकेबाजी केली, पण विजय मिळवून देऊ शकले नाहीत. आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला.