धोनी कॅप्टन असता तर RCB ने 3-4 वेळा IPL ट्रॉफी जिंकली असती - अक्रम
Wasim Praise MS Dhoni Captaincy In IPL : आयपीएलचा सोळावा हंगाम उत्तरार्धाकडे झुकलाय. पण मागील 15 आयपीएल हंगामात आरसीबीला एकदाही चषक उंचावत आलेला नाही.
Wasim Praise MS Dhoni Captaincy In IPL : आयपीएलचा सोळावा हंगाम उत्तरार्धाकडे झुकलाय. पण मागील 15 आयपीएल हंगामात आरसीबीला एकदाही चषक उंचावत आलेला नाही. आरसीबीने प्लेऑफमध्ये अनेकदा प्रवेश केलाय... तर काहीवेळा फायनलमध्ये प्रवेश केलाय. पण चषकावर नाव कोरता आले नाही. या मुद्द्यावर विराट कोहलीसह आरसीबीवर अनेकदा टीकाही झाली आहे. आता यावरुनच पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने आरसीबी आणि विराट कोहलीच्या नेतृत्वावर निशाणा साधलाय. एमएस धोनी कर्णधार असता तर आरसीबीने आतापर्यंत तीन ते चार वेळा चषक उंचावला असता, असे वक्तव्य वसीम अक्रम याने केलेय.
एका स्पोर्टस संकेतस्थळाळा वसी अक्रम याने मुलाखत दिली होती. या मुलाखतीत वसीम अक्रम याने आरसीबी आणि विराट कोहलीच्या नेतृत्वावर टीका केली. वसीम अक्रम म्हणाला की, आरसीबीने आतापर्यंत एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. इतर संघाच्या तुलनेत आरसीबीकडे चाहत्यांचा सपोर्ट जास्त आहे. त्यासोबत जागतिक क्रिकेटचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली आहे, पण दुर्भाग्यपूर्ण आरसीबीकडे एकही ट्रॉफी नाही. जर धोनी या संघाचा कर्णधार असता तर आतापर्यंत तीन चार ट्रॉफी असत्या.
वसीम अक्रम याने धोनीच्या नेतृत्वाचे कौतुक केलेय. अक्रम म्हणाला की, कोणताही खेळाडूकडे धोनीच्या नेतृत्वात खेळताना वेगळाच आत्मविश्वास येतो. धोनी मैदानावर शांत असतो.. पण आतून तो खूप आक्रमक असतो.. कोणत्याही खेळाडूला वाटते की, कर्णधार आपल्यासोबत आहे. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो.
2016 मध्ये आरसीबी फायनलमध्ये पोहचली होती आरसीबी -
आरसीबीने आतापर्यंत तीन वेळा फायनलमध्ये प्रवेश केलाय. पण तिन्ही वेळा आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागलाय. 2009 मध्ये डेक्कन चार्जसविरोधात फायनलमध्ये आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला होता. 2011 मध्ये आयपीएलमध्ये आरसीबीला चेन्नईने हरवले होते. 2016 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील आरसीबीला हैदराबादने पराभूत केले होते. त्याशिवाय सहा ते सात वेळा आरसीबीने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय.
View this post on Instagram
View this post on Instagram