Rohit Sharma Special Package : सिडनी कसोटीतून हिटमॅनची माघार? रोहित ब्रेक घेणार?
Rohit Sharma Special Package : सिडनी कसोटीतून हिटमॅनची माघार? रोहित ब्रेक घेणार?
गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघात फूट असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. सर्वाधिक प्रश्न मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबाबत उपस्थित केले जात आहेत. कारण 10 वर्षानंतर पहिल्यांदा एखाद्या कोचच्या मार्गदर्शनात भारतीय टीम बॉर्डर गावसकर ट्रॉफीत पिछाडीवर आहे. सिडनी कसोटी ड्रॉ झाली किंवा पराभव स्वीकारावा लागल्यास बॉर्डर गावसकर ट्रॉफी भारतीय संघाच्या हातून जाऊ शकते. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनातील हा भारतीय संघाचा दुसरा कसोटी मालिका पराभव ठरेल.
गौतम गंभीरनं भारताचं मुख्य प्रशिक्षक पद स्वीकारल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकली होती. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वात झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्य मालिकेत भारत पराभूत झाला. भारतात झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. भारतानं तीन कसोटी सामने गमावले. एका रिपोर्टनसुार आता गौतम गंभीरकडे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी केवळ 66 दिवस राहिल्याचं बोललं जातं आहे.
गौतम गंभीरनं संघाचं प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर भारताची कामगिरी फारशी समाधानकारक राहिलेली नाही. पीटीआयच्या हवाल्यानं बीसीसीआयच्या सूत्रांनुसार जर चॅम्पियन्स ट्रॉफी पर्यंत भारताच्या कामगिरीत सुधारणा नाही झाली तर गंभीरला मुख्य प्रशिक्षक पदावरुन हटवलं जाऊ शकतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियात अजून एक कसोटी मॅच खेळली जाणार आहे, त्यानंतर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहे. त्या दरम्यान इंग्लंड विरुद्ध भारत खेळणार आहे