एक्स्प्लोर

मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्या तरुणाला जमावाने मागायला लावली माफी

फळविक्रेताला मराठी का येत नाही विचारले म्हणून जमावाने तरुणाला कान पकडून माफी मागायला लावल्याची घटना उघडकीस आली आहे.

ठाणे : महाराष्ट्रात राहून मराठीला विरोध करण्याच्या घटना सातत्याने घडताना दिसून येत आहेत. विशेषत: राजधानी मुंबईतच (Mumbai) या गोष्टीचा प्रत्यय येतो. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये एका शुक्लानामक अधिकाऱ्याने मराठी कुटुंबाला गुंडांकरवी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी सरकारला धारेवर धरल्याचं दिसून आलं, तर विधिमंडळ अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेला आला होता. त्यानंतर, संबंधित अधिकाऱ्याला पोलिसांनी (Police) अटक करुन चौकशीही केली. आता, पुन्हा एकदा मराठी व अमराठी असा वाद समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एका मराठी (Marathi) तरुणाला जमलेल्या जमावाने दमदाटी करत माफी मागायला भाग पडल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून संबंधित युवक दोन्ही कानांना हात धरुन जमावाची माफी मागत असल्याचे व्हिडिओत दिसून येते. तसेच, मी केवळ फळविक्रेत्याला मराठीत बोल असा आग्रह केल्याचंही तो वारंवार सांगताना दिसून येतो.  

फळविक्रेताला मराठी का येत नाही विचारले म्हणून जमावाने तरुणाला कान पकडून माफी मागायला लावल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी ⁠मराठी तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ⁠या मराठी युवकास मुंब्रा येथील जमावाने शिवीगाळ केली आहे. मुंब्रा येथे मराठी-हिंदी वाद झाल्याचे दिसून येते. ⁠एक मराठी तरुण मुंब्र्यातील एका भाजी विक्रेत्याकडून फळ घेत असताना हा वाद झाल्याची माहिती आहे. ⁠फळविक्रेत्याकडून फळे घेत असताना मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितले. मात्र, फळविक्रेत्याने मराठी येत नसल्याचे सांगत्यावरुन दोघांमध्ये हा वाद झाला.  

⁠मला मराठी येत नाही मी हिंदीत बोलणार असं फळ विक्रेता बोलताच मराठी तरुण “महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठी आलेच पाहिजे, मी मुंब्रा बंद करुन टाकेन” असं बोलू लागला. मराठी तरुणाच्या या वाक्यावरुन इतर फळविक्रेतेही तिथे आले व वाद आणखी चिघळला. इतर फळ विक्रेत्यांसह स्थानिक रहिवाशांनी देखील घटनास्थळी धाव घेत वाद जाणून मराठी युवकास घेरले. तसेच, मुंब्र्यात मराठी-हिंदी वाद का करतो, मुंब्रा शांत आहे, शांत राहू दे असं मुंब्र्याती स्थानिक बोलू लागले. त्यानंतर, गर्दी वाढल्याने वाद चिघळला आणि लोकांनी त्या मराठी तरुणाला मुंब्रा पोलीस स्टेशन येथे नेऊन त्यावरच गुन्हा दाखल केला. 

युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिले

आम्हाला मराठी येत नाही, काय करायचे ते कर असं गर्दीतले लोकं बोलत होते, ही ⁠घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ⁠हिंदी येते तर हिंदीत बोल, वाद कशाला करतो असं बोलून मराठी तरुणाला पोलीस स्टेशनला नेण्यात आले. ⁠विशाल गवळी असे तरुणाचे नाव असून त्याला आईने फळं आणायला पाठवले होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमातून व्हायरल होत असून नेटीझन्स आपल्या कमेंट करत आहेत.

हेही वाचा

बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले

महत्त्वाच्या बातम्या

प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
Kalyan Land Scam : कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget