Special Report ladki bahin yojana :लाडक्या बहिणींची पळताळणी होणार, अपात्रांवर कारवाई होणार
Special Report ladki bahin yojana :लाडक्या बहिणींची पळताळणी होणार, अपात्रांवर कारवाई होणार
लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी करणार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती, शासन निर्णयात बदल होणार नसल्याचंही तटकरेंकडून स्पष्ट. आता मोठी बातमी लाडकी बहीण योजनेबाबत.. आज राज्य सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली... या बैठकीत लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांबाबत पडताळणी करणार असल्याची माहिती, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली.. तसंच शासन निर्णयात बदल होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं... आधारकार्ड आणि बँकेतील नावात तफावत असल्यास... किंवा सरकारी नोकरी लागलेल्या महिलाही या योजनेस पात्र असणार नाहीत...'लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी करणार' लाडक्या बहिणींना निकषांचं बंधन- अडीच लाखांहून कमी उत्पन्न असलेल्या महिलांना लाभ मिळणार चारचाकी वाहनं असणाऱ्यांनाही लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही सरकारी नोकरी असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही आधारकार्ड आणि बँकेतील नावात तफावत असल्यास अर्ज अपात्र