Gautam Gambhir : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर? गौतम गंभीरचंही काऊंटडाऊन सुरु, हातात केवळ 66 दिवस बाकी?
Gautam Gambhir : भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं पदभार स्वीकारल्यानंतर महत्त्वाच्या मालिकांमध्ये भारतीय क्रिकेट संघाला अपयश आलंय.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघात फूट असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. सर्वाधिक प्रश्न मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबाबत उपस्थित केले जात आहेत. कारण 10 वर्षानंतर पहिल्यांदा एखाद्या कोचच्या मार्गदर्शनात भारतीय टीम बॉर्डर गावसकर ट्रॉफीत पिछाडीवर आहे. सिडनी कसोटी ड्रॉ झाली किंवा पराभव स्वीकारावा लागल्यास बॉर्डर गावसकर ट्रॉफी भारतीय संघाच्या हातून जाऊ शकते. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनातील हा भारतीय संघाचा दुसरा कसोटी मालिका पराभव ठरेल.
गौतम गंभीरनं भारताचं मुख्य प्रशिक्षक पद स्वीकारल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकली होती. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वात झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्य मालिकेत भारत पराभूत झाला. भारतात झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. भारतानं तीन कसोटी सामने गमावले. एका रिपोर्टनसुार आता गौतम गंभीरकडे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी केवळ 66 दिवस राहिल्याचं बोललं जातं आहे.
गौतम गंभीरनं संघाचं प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर भारताची कामगिरी फारशी समाधानकारक राहिलेली नाही. पीटीआयच्या हवाल्यानं बीसीसीआयच्या सूत्रांनुसार जर चॅम्पियन्स ट्रॉफी पर्यंत भारताच्या कामगिरीत सुधारणा नाही झाली तर गंभीरला मुख्य प्रशिक्षक पदावरुन हटवलं जाऊ शकतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियात अजून एक कसोटी मॅच खेळली जाणार आहे, त्यानंतर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहे. त्या दरम्यान इंग्लंड विरुद्ध भारत खेळणार आहे, यात भारताच्या संघाची कामगिरी सुधारली नाही तर गंभीरच्या मुख्य प्रशिक्षक पदावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं.
रिपोर्टनुसार बीसीसीआयनं अजूनही गौतम गंभीरवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. गंभीरला अजून वेळ दिला पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. गौतम गंभीर संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सातत्यानं प्रयोग करत असल्यानं खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. त्यामुळं गंभीरला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंतचा वेळ आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीला सुरु होणार आहे. तर, फायनल 9 मार्चला होणार आहे. भारताचे सामने दुबईत होणार आहेत. इतर संघांचे सामने पाकिस्तानात होणार आहेत.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीमध्ये पाचवी कसोटी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणार असल्याचा विश्वास गौतम गंभीरनं व्यक्त केला आहे. या सामन्यासाठी संघात काही प्रमाणात बदल होतील. रोहित शर्मा या कसोटीत नसेल तर नेतृत्त्व जसप्रीत बुमराहकडे असू शकतं.
इतर बातम्या :