(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat Kohli Golden Duck: विराट कोहली चौथ्यांदा गोल्डन डकचा शिकार, चार वेळा शून्यावर गमावली विकेट
Virat Kohli Golden Duck: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहलीसाठी आयपीएलचा पंधरावा हंगाम चांगला ठरला नाही.
Virat Kohli Golden Duck: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहलीसाठी आयपीएलचा पंधरावा हंगाम चांगला ठरला नाही. आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी विराट कोहलीनं आरसीबीच्या संघाचं कर्णधार पद सोडलं आणि आता तो फलंदाजीमध्येही संघर्ष करताना दिसत आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आज सुरू असलेल्या सामन्यात विराट कोहली शून्याबाद बाद झाला. या सामन्यात विराट कोहली गोल्डन डकचा शिकार ठरला. आयपीएलमध्ये चौथ्यांदा विराट कोहली खाते न उघडता माघारी परतला आहे.
लखनौविरुद्ध सामन्यात बंगळुरूचा एक विकेट्स गेल्यानंतर विराट कोहली फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. पण दुष्मंता चमिराच्या पहिल्या षटकातील सहाव्या चेंडूवर विराट कोहलीनं आपली विकेट्स गमावली. तो एक चेंडू खेळत शून्यावर झेलबाद झाला.
कधी आणि कोणत्या गोलंदाजानं विराटला शून्यावर बाद केलं?
1) अशिष नेहरा (मुंबई इंडियन्स, 2008)
2)संदीप शर्मा (पंजाब इलेव्हन, 2014)
3) नॅथन कुल्टर (कोलकाता नाईड रायडर्स, 2017)
4) दुष्मंता चमिरा (लखनौ सुपर जायंट्स, 2022)
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात विराट कोहलीनं निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध त्यानं 41 धावा केल्या. त्यानंतर कोलकाताविरुद्ध 12 धावा, राजस्थानविरुद्ध 5 धावा, मुंबईविरुद्ध 48 धावा आणि आज लखनौविरुद्ध शून्यावर बाद होऊन माघारी परतला.
हे देखील वाचा-
- LSG Vs RCB: बंगळुरूच्या फाफ डू प्लेसिसची कर्णधार खेळी, लखनौसमोर 182 धावांचं लक्ष्य
- IPL 2022: अखेरच्या षटकात सामना फिरवणाऱ्या ओबेड मॅकॉयचं भरमैदानात पुष्पा सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ
- IPL 2022: आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; एका चेंडूवर धावून काढल्या 'इतक्या' धावा