Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला
कोहली केवळ 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या ग्लेन फिलिप्सने त्याला अभूतपूर्व पद्धतीने झेपावत झेलबाद केले.

Glenn phillips catch of virat kohli : दुबईत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गट टप्प्यातील शेवटचा सामना खेळला जात आहे. किंग विराट कोहलीसाठी हा सामना अत्यंत खास होता. कारण हा त्याचा 300 वा एकदिवसीय सामना होता. मात्र, या स्पेशल सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही. कोहली केवळ 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या ग्लेन फिलिप्सने त्याला अभूतपूर्व पद्धतीने झेपावत झेलबाद केले.
If fielding is an art then Glenn Phillips is the Picasso of it 🥵🔥 #INDvsNZ pic.twitter.com/P603IroX0z
— ★ 𝘖𝘭𝘪𝘷𝘦𝘳 ★ (@aravindmsd_07) March 2, 2025
हवेत झेपावत एका हातात कॅच टिपला
भारताला 30 धावांवर विराट कोहलीच्या रूपाने तिसरा धक्का बसला. मॅट हेन्रीने टाकलेल्या 7व्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराट कोहलीने ऑफमध्ये शॉट मारण्याचा प्रयत्न केला. बॉल पॉइंटच्या दिशेने गेला असतानाच तिथे उभ्या असलेल्या ग्लेन फिलिप्सपासून थोडा दूर होता. पण नेत्रदीपक हवेत उडी मारल्यानंतर फिलिप्सने एका हाताने झेल टिपला. फिलिप्सची झेप पाहून किंग विराट कोहली सुद्धा काही काळ स्तब्ध झाला आणि काय झालं हे पाहत राहिला.
Whoever said Kiwis can't fly never saw Glenn Phillips field. #INDvNZ #ChampionsTrophy pic.twitter.com/PrV8GMZ3Dz
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) March 2, 2025
अनुष्का शर्माने कपाळाला हात लावला
ग्लेन फिलिप्सने तो अप्रतिम झेल घेतल्याने विराट कोहलीलाही आश्चर्य वाटले. स्टँडवर बसलेली पत्नी अनुष्का शर्माही निराश झाली. तिने कपाळाला हात लावला, ज्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. विराटचा 300 वा सामना पाहण्यासाठी अनुष्का दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पोहोचली. कोहलीच्या आधी कर्णधार रोहित शर्मा 15 धावा करून आणि शुभमन गिल 2 धावा करून बाद झाला. गिललाही मॅट हेन्रीने बाद केले, तर कर्णधार काइल जेमिसनच्या चेंडूवर झेलबाद झाला.
The Reactions of Virat Kohli and Anushka Sharma says it all for Glenn Phillips' Catch. pic.twitter.com/PPNa2pjXJ7
— Tanuj Singh (@ImTanujSingh) March 2, 2025
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. मात्र, हा सामना महत्त्वाचा आहे कारण त्याचा निकाल ठरवेल की उपांत्य फेरीचे सामने कोणत्या संघांमध्ये खेळवले जातील. भारत 4 मार्चला दुबईत उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे, तर न्यूझीलंडचा उपांत्य सामना 5 मार्चला होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल आणि पराभूत झालेला संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल.























